आज राष्ट्रीय विज्ञान दिन आहे. या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील खोडद येथील दुर्बिणीची माहिती घेणे आपल्याला निश्चितच आवडेल.
– संपादक
अंतराळ हे मानवासाठी नेहमी कोडे राहिलेले आहे. या अंतराळाचा शोध घेण्यासाठी अनेक खगोलशास्त्रज्ञ आजही धडपडत आहेत. नासासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय संघटना विश्व निर्मितीचे कोडे सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
19 व्या शतकापासूनच रेडिओलरीचा संपर्कासाठी उपयोग करण्यात येऊ लागला. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात रेडिओ साधनांमध्ये मोठी प्रगती झाली. पृथ्वीच्या वातावरणातील आयनॉस्पिअरचा उपयोग करून त्यावरून रेडिओ लहरी परावर्तित करून एका खंडातून दुसऱ्या खंडात कार्यक्रमाचे प्रक्षेपण करणे शक्य झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या तंत्राचा उपयोग सर्वच देशांनी करून घेतला.
भारतात रेडिओ खगोलशास्त्राची सुरुवात 1952 मध्ये झाली. थोर शास्त्रज्ञ, डॉक्टर होमी भाभा यांनी मुंबईत 1945 मध्ये स्थापन केलेल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) या संस्थेतून जागतिक दर्जाचे संशोधन घडावे या हेतूने जगभर फिरून तरुण बुद्धिमान संशोधकांना स्वदेशी येण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेक मोठे संशोधक मायदेशी परतले. त्यातील एक म्हणजे जीएमआरटी या रेडिओ टेलिस्कोपचे जनक डॉक्टर गोविंद स्वरूप.

डॉक्टर गोविंद स्वरूप यांनी सर्वप्रथम 1984 मध्ये रेडिओ टेलिस्कोपचा, जीएमआरटीचा पहिला सादर केला. या प्रकल्पासाठी पुण्यापासून 90 किलोमीटरवर उत्तरेला नारायणगाव जवळील खोडद येथील जागा निवडण्यात आली. अमेरिकेतील त्या वेळच्या सर्वात मोठ्या व्हेरी लार्ज अरे पेक्षा व्ही एल ए तिप्पट आकाराच्या ठरणाऱ्या या प्रकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानाच्या आधारे प्रकल्पाची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. आरेखणापासून प्रत्यक्ष उभारणीपर्यंत सर्व गोष्टींमध्ये भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञानी नव्या कल्पनांचा वापर करण्यास सुरुवात केली. मोठ्या प्रयत्नानंतर नारायणगाव जवळ हा जगप्रसिद्ध प्रकल्प आकार घेऊ लागला.
आकाशातील तारा समूहात कमी अधिक तीव्रतेचे विकरण होत असते. हे विकरण तारांच्या गुरुत्वाकर्षणामुळे किंवा कृष्णविवराच्या अस्तित्वामुळे होते. याचा शोध जगातील दहा ते बारा शास्त्रज्ञ वेगवेगळ्या दुर्बिणीच्या माध्यमातून घेत होते.
यातील नासाचे प्रमुख शास्त्रज्ञ रेन रेनॉल्ट रेन रेन हे नासाच्या चंद्राक्ष या दुर्बिणी द्वारे माहिती संकलित करीत होते. तारका समूहातील तारे एकमेकांवर आदळल्यावर होणाऱ्या विकरणाचा अभ्यास ते करीत होते. मात्र अशी विकरणाचा वेध घेण्याची क्षमता रेडिओ दुर्बिणीची जास्त असते.
खोडद येथील जायंट मीटर व्हेअर रेडिओ टेलिस्कोप जीएमआरटी यासाठी परिपूर्ण असल्याने या दुर्बिणीचा त्यांनी आकाशातून येणाऱ्या लहरीचा अभ्यास करण्यासाठी उपयोग केला. यासाठी जीएमआरटी चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर धर्मवीर लाल यांनी मोलाची मदत केली .
संशोधनाद्वारे सक्रिय असलेल्या ए बेल 34 11 व ए बेल 34 12 या दोन आकाश गंगेतील केंद्रात अस्तित्वात असलेली अति प्रभावी कृष्णविवरे व एकमेकांवर आढळणारे अतिप्रचंड मोठे अवकाश घटकांचे समूह यासारखे घटक हे इलेक्ट्रॉनला गतिमान करण्यास कारणीभूत ठरतात, हा महत्त्वाचा शोध लावण्यात जीएमआरटी च्या निरीक्षणामुळे शास्त्रज्ञांना तीस वर्षांनी यश आले. ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. यामुळे भविष्यात अवकाशातील अनेक न ऊलगडलेल्या घटनांचा शोध घेणे शक्य होणार आहे .
मागील ३ दशकापासून या दुर्बिणीने अवकाशातील अनेक महत्त्वाच्या घडामोडीचा वेध घेतला. आतापर्यंत जीएमआरटीने पल्सर चे संशोधन तसेच इतर अनेक महत्त्वाचे शोध लावले आहेत. जागतिक पातळीवर या दुर्बिणीची शास्त्रज्ञांनी दखल घेतली आहे.
जगभरातील खगोलशास्त्रज्ञांनी या रेडिओ दुर्बीणने अवकाशाचा वेध घेऊन आपली निरीक्षणे नोंदविली आहेत. अवकाश संशोधनातील कामगिरीची दखल घेऊन भारताबाहेरच्या दहा देशांच्या वतीने एकत्र येऊन सुरू होत असलेल्या या रेडिओ दुर्बीण प्रकल्पामध्ये भारताला मार्गदर्शक म्हणून मानाचे स्थान मिळाले आहे.
रशियन आणि युरोपियन स्पेस एजन्सी च्या वतीने 14 मार्च 2016 रोजी एक्सो मार्स नावाचे यान मंगळावर सोडले होते. 16 ऑक्टोंबर रोजी हे यान स्वतंत्र झाले होते. 16 ऑक्टोंबर ते एकूण 19 ऑक्टोबर या कालावधीत हे यान मंगळावर दाखल होणार होते. हे यान मंगळावर उतरताना त्याला काही अडचणी येतात का याचे सूक्ष्म निरीक्षण करण्यासाठी जीएमआरटी प्रकल्पाची नासाने व युरोपमधील ईसाने निवड केली होती. या प्रकल्पाचे अधिष्ठाता प्रो यशवंत गुप्ता यांनी ही जबाबदारी लीलया पेलली. सिग्नल द्वारे सर्वेक्षण करीत या यानाशी यशस्वीरित्या संपर्क साधला.
देशात विज्ञानाचा प्रसार व्हावा यासाठी संस्थेतील वरिष्ठ प्रशासकीय व वित्तीय अधिकारी डॉक्टर जे के सोळंकी व त्यांचे सहकारी प्रयत्नशील आहेत.
या प्रक्रियेत पुण्याजवळील खोडद येथील रेडिओ खगोलशास्त्र भरीव कामगिरी करणाऱ्या जीएमआरटी चे जायंट मीटर वेव रेडिओ टेलिस्को कार्य दीपस्तंभ सारखे आहे.
नुकतेच दोन आकाशगंगा मधील केंद्रात असलेली अति प्रभावी कृष्णविवरे आणि एकमेकांवर आदळणाऱ्या व अतिप्रचंड मोठ्या अवकाश घटकांच्या समूहाचे कोडे
जीएमआरटी द्वारे केलेल्या निरीक्षण आणि संशोधनाने शास्त्रज्ञांनी सोडविले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा भारताची मान उंचावली आहे. यात मोलाची कामगिरी करून नासाचे शास्त्रज्ञ रीनोट वेन विरेन व एनसीआरए चे शास्त्रज्ञ डॉक्टर धर्मवीर लाल यांच्यासह इतर शास्त्रज्ञांनी जीएमआरटी च्या संशोधनातून अनेक कोडे सोडविले आहे.
मानवा व्यतिरिक्त अंतराळात इतर जीवसृष्टीचे अस्तित्व आहे का ? याचाही रेडिओ लहरी ग्रहण करून शोध घेण्याचा प्रयत्न जी एम आर टी द्वारे होत आहे.
महाराष्ट्रातील शाळा, कॉलेजेस, विज्ञान प्रेमी यांनी अवश्य भेट दिली पाहिजे, असे हे आधुनिक भारतातील विज्ञान मंदिर आहे.
– टीम एनएसटी. ☎️9869484800