Saturday, October 18, 2025
Homeयशकथाआनंदी आनंद डांगरे

आनंदी आनंद डांगरे

युवकांच्या गळयातील ताईत, सदैव प्रसन्न, हसतमुख, दिलखुलास जीवन जगणारे, तरुणांचे प्रेरणास्थान असणारे व सर्वांना संघटित करून स्वतः बरोबर इतरांची व समाजाची देखील प्रगती साधणारे असे आनंद डांगरे…….

पुण्याचे आनंद डांगरे यांचा जन्म २७ एप्रिल १९७७ रोजी साली झाला. वडील श्री पदमाकर जगन्नाथ डांगरे, आई माणिक पदमाकर डांगरे व दोन भाऊ रविंद्र आणि सागर असा त्यांचा परिवार.

वडील नामांकित वकील होते. आठवीपर्यंत शिक्षण अगदी व्यवस्थित झाले. पुढे १९९० साली वडिलांचे छत्र हरपले. परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले. त्यावेळी त्यांचा मोठा भाऊ दहावीत तर लहान भाऊ पाचवीत होता. आर्थिक परिस्थिती अतिशय कठीण बनली.

आनंदजींनी शालेय शिक्षण नु.म.वी. पुणे येथे तर बीएमसीसी कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. खरं म्हणजे लहानपणापासून आनंदजी अतिशय हुशार व अभ्यासू असल्याने त्यांना डॉक्टर होण्याची इच्छा होती. मात्र घरातील जबाबदारी व आर्थिक परिस्थिती लक्षात घेता एवढा वेळ व पैसेही नव्हते. त्यामुळे हे एक स्वप्नच राहून गेले व त्यांनी कॉमर्स साईड घेऊन सी.ए. करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ते पैसे वाचवण्यासाठी ७ ते ८ किलोमीटर पायी क्लासला जात असत. संकटं कधीही एकटी येत नाही. ती सोबत उपायसुद्धा घेऊन येतात. फक्त गरज असते संयम ठेवून उपाय शोधण्याची. शेवटी दृष्टी तशीच सृष्टी, नाही का ?

आनंदजींना कॉलेजमध्ये असतानाच लक्षात आले की स्वतः लोकांशी बोलून ते मार्केटिंग उत्तम करू शकतील. म्हणून मित्रासोबत अवघ्या २२ व्या वर्षी एकत्र व्यवसाय सुरू केला. एकीकडे व्यवसाय व शिक्षण अशी दुहेरी कसरत ते करत होते. मात्र त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ लागले. वेळ अपुरा पडत होता.

डॉ प्रभाकर सातपुते यांनी त्यांच्या मुलीसाठी मागणी घातली व त्यांचे २००३ साली लग्न झाले. त्यावेळी आनंदजी यांचे महिन्याचे उत्पन्न केवळ १५०० रुपये होते. त्यांच्या शेजारी असलेल्या कांतीलाल काकांनी त्यांना सुचवले की, सी ए करण्यापेक्षा स्वतःच ए. सी. चा व्यवसाय चालू करावा. कारण ह्या महागड्या शिक्षणासाठी वेळ व पैसे असे दोन्हीही लागतील. हाच त्यांचा आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला.

सी ए न करता त्यांनी आता व्यवसायावर पूर्ण लक्ष देता केंद्रित केले. नव्याने सुरवात केली. त्यांनी ह्या मिळालेल्या संधीच सोन केलं. सुरवातीला ए सी रिपेरिंग व मेंटेनन्स चालू केले. घरातील जबाबदारी स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून डीलरशिप घेण्याचा विचार केला. मात्र भांडवल नसल्याने कंपनीने स्पष्ट नकार दिला. त्यावर हार न मानता एका व्यक्तीकडून माल घेऊन तो दुसऱ्याला विकणे हे चालू केले. त्यामुळे व्यवसायात वाढ झाली. दिवसेंदिवस आर्थिक परिस्थिती सुधारत गेली.

बोलका व मनमिळाऊ स्वभाव, जिद्द, प्रचंड मेहनत, आत्मविश्वास व वेळोवेळी घेतलेले धाडसी निर्णय यामुळे प्रगती होत गेली. आज ते एल.जी, व्हिडीओकॉन, टी सि एल, मित्सुबिशी हेवी इ. जेनेक्स कुलिंग सिस्टिम या नामांकित कंपन्यांचे डिस्ट्रीब्युटर आहेत. त्यांचे नाव एअर कंडीशन क्षेत्रात आदराने घेतले जाते.

आनंदजींना कॉलेज मध्ये शिकत असतानाच सामाजिक कार्याची आवड होती, जी त्यांनी आजपर्यत जोपासली आहे. त्यांना विचारले की त्यांना आनंद कशात मिळतो ? त्यावर त्यांनी सुंदर उत्तर दिले, “दुसऱ्यांना आनंद देण्यात ते अधिक आनंदी होतात” यावरून त्यांची व्यापक जीवनदृष्टी दिसते.

आनंदजीं कासार समाज युवा मंडळाचं काम पाहू लागले. तसेच मध्यवर्ती मंडळ, पुणे जिल्हा विकास समितीसाठी ते काम करू लागले. आज ते कालिका देवी संस्थानचे ते अध्यक्ष व मध्यवर्ती मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत. ते स्वतः आग्रहाने सर्वांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करतात, त्यामुळे समाजाची एकी दिसून येते. त्यांचे असे म्हणणे आहे की आपण स्वतः लोकांमध्ये आले गेले पाहिजे व समाजाला एकत्रित केले पाहिजे. समाज कार्याचे आधुनिकीकरण करण्याचा ते सतत प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे थोडयाच अवधीत ते अत्यंत लोकप्रिय झाले. लायन्स क्लब, लाईफ स्कुल संस्था तसेच इलेक्ट्रॉनिक्स डीलर असोसिएशन व बिझनेस नेटवर्किंग इंटरनॅशनल अशा विविध संस्थेतून ते कार्यरत आहेत.

घरातून आई, भाऊ व पत्नी यांची पुरेपूर साथ असल्यामुळेच आपण अनेक जबाबदाऱ्या उत्कृष्टपणे पार पाडू शकतो असा आवर्जून उल्लेखही ते करतात. त्यांच्या आईची अतिशय आधुनिक विचारसरणी असल्यामुळे घरातील सुनांना करिअर करण्याला चांगला वाव मिळतो. आईच्या उत्तम संस्कारांमुळे स्त्रियांनी देखील त्यांचे छंद जोपासावे व स्वतःचे करियर करावे असे त्यांना वाटते त्यामुळे पत्नी सौ अनुराधाला पूर्ण स्वातंत्र्य देऊन त्यांचा कामात देखील सहकार्य करतात. अनुराधाताई आज ऑनलाइन चित्रकलेचे क्लास घेतात. हे क्लासेस देश विदेशातही लोकप्रिय आहेत.

आनंद डांगरे परिवरा समवेत

आनंदजींना लहानपणापासून गायन, नुत्य, पेंटिंगची आवड असल्याने ते छंद त्यांनी आजही जोपासले आहेत व त्यात देखील प्राविण्य मिळवले आहे. त्यांना दोन मुलं असून मुलगा आर्य दहावीत तर मुलगी आनया सहावीत शिकत आहे.

उत्तम संभाषण कौशल्य असल्याने आनंदजीं स्वतःचे विचार लोकांपुढे प्रभावीपणे मांडू शकतात. आपल्याबरोबर इतरांनी देखील प्रगती करावी असा प्रामाणिक हेतू मनात ठेवून उत्तम वक्ता कसा असावा, त्यासाठी कोणती तयारी करावी ह्याचे मार्गदर्शन युट्यूब चॅनेलच्या मार्फत ते करतात. तसेच नाती कशी जोपासावी व त्यामध्ये बळकटी कशी साधावी असे आजचे जे प्रमुख प्रश्न आहेत, अशा विषयांवर जनजागृती करण्याचे मोलाचे काम करत आहे.

जेव्हा आपण लोकांना काही सांगतो तेव्हा ती गोष्ट स्वतः आधी आत्मसात करून स्वतःच उदाहरणामार्फत इतरांना सांगितले पाहिजे अशी सकारात्मक विचारसरणी त्यांची आहे. युवा पिढी त्यांना आपले आदर्श मानून त्याच्याकडून नवनवीन गोष्टी शिकत आहेत. आव्हानमुळेच मनुष्याची खऱ्या अर्थाने प्रगती होते व तो यशस्वी होतो व जगण्याला नवी दिशा मिळते. आव्हाने स्वीकारा व ती पूर्ण करा, वाटेत अनेक अडथळे आले तरी आत्मविश्वासाने त्याचा सामना करा व आपले निष्ठीत ध्येय पूर्ण करा असे त्यांचे मत आहे

त्याचबरोबर कोरोना एक संधी – कोरोना एक आव्हान, चाळिशीनंतरचे उत्तम आरोग्य, उत्तम वक्ता बना अशा विविध विषयांवर ते मार्गदर्शन करतात. ह्या विषयांवर त्यांचे अनेक लहान मोठे कार्यक्रम झाले आहेत. आनंदी राहणे हा त्यांच्या जीवनाचा उद्देश आहे  “आनंद द्या व आनंद घ्या” ही संकल्पना मनात ठेवून ते समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे मोलाचे काम करत आहेत. लोकांच्या जीवनात चांगला बदल होऊन त्यांनी प्रगती साधावी, त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा असे त्यांना मनापासून वाटते. त्या दृष्टीने भविष्यात देखील काम करण्याची त्यांची इच्छा आहे.

नावाप्रमाणेच आनंदजी जीवनाचा आनंद घेतात. स्वतःच्या फिटनेस साठी ते दररोज मेहनत घेतात.

सदैव हसतमुख असे त्यांचे व्यक्तिमत्व खास करून युवकांना आकर्षित करते. जगण्यातील त्यांचा जिवंतपणा पाहून सर्वांना प्रेरणा मिळते. अशी सर्व गुण संपन्न व्यक्ती स्वतःबरोबर इतरांची प्रगती साधते. आनंदजीना भावी उपक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

रश्मी हेडे

– लेखन : रश्मी हेडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

 

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. Anandji is evergreen person and alway positive person…
    Many things we can take from him
    Best regards to Anandji…
    …Nandkumar Kolapkar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

ॲड.श्रध्दा बापूसाईनाथ राऊळ. आरवली.. on माणसांच्या गर्दीतूनी या…!!
संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप