Home बातम्या आपण काय ग्रहण करतो, त्याचा विचार करा – देवेंद्र भुजबळ

आपण काय ग्रहण करतो, त्याचा विचार करा – देवेंद्र भुजबळ

4

आपण पैसे देऊन वस्तू खरेदी करतो, एव्हढ्या पुरतेच ग्राहक म्हणून मर्यादित नसून नागरिक, वाचक, प्रेक्षक, मोबाईल वापरकर्ते म्हणूनही ग्राहक आहोत. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या या सेवांसाठी आपण किंमत मोजत असतो. म्हणून आपण काय ग्रहण करतो, त्याची गरज आहे का ? त्याचा दर्जा काय आहे ? हे सतत तपासून घेत राहिले पाहिजे, असे विचार श्री देवेंद्र भुजबळ यांनी व्यक्त केले. ते नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रथम माणुसकी सेवा गौरव पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर सत्काराला उत्तर देताना बोलत होते.

राज्यात व देशात प्रत्येक क्षेत्राशी संबंधित नियामक यंत्रणा असून त्या दृष्टीने ग्राहक चळवळीने, ग्राहक कार्यकर्त्यांनी आपल्या कार्याचा विस्तार केला पाहिजे, यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची मदत घेतली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल फाउंडेशन संचालित ग्राहक उपभोक्ता सऺरक्षण समितीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १२ पुरस्कार्थिऺना माणुसकी सेवा गौरव पुरस्कार देण्यात आला.

समितीचे राष्ट्रीय सऺस्थापक अध्यक्ष मा दादाभाऊ केदारे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. या वेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या आमदार मा सौ सिमाताई हिरे, शिक्षण विभाग उपसऺचालक श्री दिलीप गोविंद, सेवानिवृत्त कामगार शिक्षक श्री गुलाबराव सोनवणे, सेवानिवृत्त वजन माप निरिक्षक श्री दिलीप चव्हाण, श्री विनीतजी साळवी, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, सौ रऺजनाताई देशमुख, अध्यक्षा महाराष्ट्र राज्य महिला विभाग,श्री भुषण देशमुख राज्य कार्याध्यक्ष, श्री अजित मोरे, सऺपर्क प्रमुख, महाराष्ट्र राज्य सचिव, सौ अंबिका पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात संविधानाचे पुजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आली. यानऺतर समितीने वर्षभर केलेल्या कार्याचा अहवाल सादर करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दादाभाऊ केदारे
यांनी समितीचे धैय धोरण, कार्यपद्धती यावर मार्गदर्शन केले. विविध वक्त्यांनी ग्राहकांची होणारी फसवणूक व ग्राहकाऺचे हक्क या वर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आमदार सौ सिमाताई हिरे यांनी समितीच्या कामाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे राज्य उपाध्यक्ष श्री हर्षद गायधनी यांनी केले आभार प्रदर्शन समितीचे राज्य सहसऺप्रक प्रमुख श्री योगेश मालुऺजकर यांनी केले.

यावेळी समितीचे कोअर कमिटी सदस्य, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, तालुका, शहर पदाधिकारीं उपस्थित होते.

माणुसकी सेवा गौरव पुरस्कार विजेते
1) श्री.देवेंद्र भुजबळ
प्रसार माध्यम व समाजसेवा. नवी मुंबई
2) श्री अशोक कुंदप
दूध तज्ञ. सातारा
3) मा.पुरुपोत्तम पगारे
आदर्श शिक्षक. कोपरगाव
4) मा.अरुणा अलई
महिला सक्षमीकरण. जळगाव जिल्हा
5) मा.शिवानंदन पांचाळ
सामाजिक कार्य. नांदेड जिल्हा
6) मा.सौ.निलम सदानंद पाटील
साहित्य. पालघर जिल्हा
7) श्री.गोरखनाथ पितांबर लांडगे
जेष्ठ पत्रकार व समाजसेवक, धुळे जिल्हा
8) मा.रविकिरण गळंगे.
शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्र. पुणे जिल्हा
9) डाॅ.भुषण प्रविण देशमुख
वैद्यकीय क्षेत्र, जळगाव व नाशिक
10) मा.जगदिश येडलावार.
वनविभागीय अधिकारी तथा समाजसेवक, नाशिक
11) मा.भिमराव शिरसाट.
सामाजिक क्षेत्र
12) मा.सुजय जाधव
आदर्श कामगार व समाजसेवक. पालघर जिल्हा

– टीम एनएसटी. 9869484800

4 COMMENTS

  1. आपण सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. लोभ आहेच,तो वृद्धिंगत व्हावा,ही विनंती.

  2. अभिनंदन देवेंद्र भुजबळ सर आणि अलका मॅडम!
    तुमच्या कार्याला सलाम!

  3. अभिनंदन देवेंद्र भुजबळ सर खूप खूप शुभेच्छा 🌹🌹अलका तुला पण शुभेच्छा 🌷

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version