Tuesday, June 17, 2025
Homeलेखआपलं आरोग्य, आपल्या हाती

आपलं आरोग्य, आपल्या हाती

आरोग्याविषयी आपण जागरूक असलं पाहिजे यासाठी यथायोग्य जनजागृती व्हावी यासाठी जगभर ७ एप्रिल हा आरोग्य दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. आरोग्य म्हणजे फक्त शारीरिकच आरोग्य नव्हे तर मानसिक, भावनिक, कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक, आर्थिक असं ते विविधांगी असतं. आपल्याला तसं ते जीवनभर लाभलं पाहिजेच. कोरोनामुळे ओढवलेल्या जागतिक परिस्थितीत “आपलं आरोग्य, आपल्या हाती” असं सांगतायत  प्रेरक संवादक अलका भुजबळ…….

मी आरोग्याविषयी जागरूक असल्याने माझ्या कर्करोगाचे निदान व त्वरित उपचार होऊ शकले. माझ्या पतीने, मुलगी देवश्रीने खूप धीराने परिस्थिती हाताळली. मलाही धीर देत राहिले. माझ्या कर्करोग लढ्यात जेष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ. रेखा डावर खंबीरपणे माझ्या पाठीशी होत्या. तीन वर्षांपूर्वी, महिला दिनी मी घरी एकटीच होते. प्रचंड एकटेपण वाटत होतं, आणि देवदूताप्रमाणें त्या माझ्या घरी आल्या. ते मोलाचे क्षण मी कधीच विसरू शकत नाही.आदर्श डॉक्टरांच्या त्या मुर्तीमंत उदाहरण आहेत.

आयुष्यात मी कधीच आजारी पडले नव्हते. गर्भारपणात घ्यावी लागतात, ती तीन इंजेक्शन तेव्हढीच घेतली होती. बाहेरचं खाणं मला कधीच आवडायचं नाही. कितीही मोठया पार्टीला, कितीही मोठया ठिकाणी गेलो तरी आम्ही रात्री उशिरा घरी आलो की, मी खिचडी का होईना, ती घरी बनवून खात असे. मी व्हॉलीबॉल प्लेअर, नंतर संसाराच्या जबाबदारी मुळे, पुढे ते बंद झाले. तरी मी रोज सकाळी चालणे, व्यायाम करणे हे होतेच.   इतकी सर्व स्वतःची काळजी घेऊन मला कॅन्सर होणं,  लगेच तो दुसऱ्या टप्प्यात जाणं, अचानक त्याचं निदान होणं, हे सर्व खूपच धक्कादायक होतं. डॉ डावर मॅडमनी खूप धीर दिला. इतकंच नाही, तर या सर्व परिस्थितीतुन गेलेल्या त्यांच्या जाऊबाईंची ओळख करून दिली. त्यांनी स्वतःचे अनुभव सांगितले. पुढे भयंकर यातना देणाऱ्या केमोथेरपी सुरू झाल्या. दोन केमोथेरपी होईपर्यंत मला इतर लोक म्हणतात, तसा काही त्रास झाला नाही. त्यामुळे खरंच काहीं त्रास होतो, यावर आमचा विश्वास बसत नव्हता. सर्व डॉक्टरांचे उपचार, सिस्टर्सनी धीर देणं, घरच्यांची साथ यामुळे मी केमो  तोंड देत राहिले.

ज्या पद्धतीने मी कॅन्सरला सामोरे गेले, ते पाहून प्रभावित झाल्याने माझी पहिली मुलाखत रिलायन्स वेब पोर्टल वर झाली. स्वानुभवावर आधारित मी “कॉमा” हे पुस्तक लिहिलं. प्रसिद्ध डिंपल पब्लिकेशननं ते प्रकाशित केलं. पुढे माय मेडिकल मंत्रा वेब पोर्टल, आकाशवाणी, दूरदर्शन वर माझ्या प्रेरक मुलाखती प्रसारित झाल्या. प्रसिद्ध लेखक – दिग्दर्शक आशिष निनगुरकर, निर्माती किरण निनगुरकर, सह निर्माते देवेंद्र भुजबळ आणि सर्व टीम मिळून माझ्या जीवनावर, “कॉमा” नावाचाच प्रभावी लघुपट निर्माण केला. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते मुंबईत राजभवन येथे तो २९ जानेवारी २०२० रोजी प्रकाशित झाला.राज्यपाल महोदय हा १० मिनिटे कालावधीचा लघुपट पाहून खूप प्रभावित झाले. त्यांच्या प्रतिसादाने आमचं मनोबल खूप वाढलं.

दरम्यान मी काम करत असलेल्या एमटीएनलमध्ये स्वेच्छा निवृत्ती योजना लागू झाली. १ फेब्रुवारी २०२० पासून मी नोकरीतून मोकळी झाले. जागतिक कर्करोग दिनानिमित्त मुंबई प्रेस क्लब- मुंबई मराठी पत्रकार संघ, नवी मुंबई महानगरपालिका, मराठी ग्रंथ संग्रहालय,ठाणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे “कॉमा- संवाद उपक्रम” केले. या उपक्रमात सुरुवातीला “कॉमा” लघुपट दाखवला जातो. ५/७ मिनिटे मी बोलते. ८/१०मिनिटे आयोजक संस्थेने बोलावलेले डॉक्टर बोलतात. पुढील २५/३० मिनिटे ही शंका समाधानासाठी असतात. तिथेच कॉमा पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध करून देत असतो. कॉमा लघुपटाला इंग्रजी भाषेत सब टायटल आहेत. कॉमा पुस्तक अन्य भारतीय भाषेत येण्यासाठी प्रयत्न करत आहे.

NM T.V ने गेल्या वर्षी आरोग्य दिनी कॉमा माहिती पटावर आधारित T. V. रिपोर्ट प्रसारित केला तो आपण पुढील लिंक वर पाहू शकता.

https://youtu.be/8Gz3yNnR4ic

आपलं आरोग्य अमूल्य आहे. त्यामुळे ते बिघडणार नाही म्हणून, आपण आपली दिनचर्या, स्वच्छता, सकस आहार,  व्यायाम, ध्यान धारणा करणे. निदान पस्तिशीनन्तर आपले डॉक्टर सांगतील त्या तपासण्या करणं आवश्यक आहे. सुखी, दीर्घ आयुष्यासाठी ते अत्यन्त आवश्यक आहे. आता सुरू असलेल्या लॉक डाऊन मुळे कधी न मिळणारा वेळ आपणास मिळत आहे. त्यामुळे एरव्ही असणारी आपली ‘वेळ मिळत नाही’, ही सबब सांगू नका. या परिस्थितीचा आपण आपल्या आरोग्यदायी जीवनासाठी उपयोग करून घेऊ या. आपल्याला निरोगी जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास काही मदत, मार्गदर्शन हवे असल्यास जरूर संम्पर्क साधा. मोबाईल क्रमांक आहे 9869043300/9869484800.

शब्दांकन:- देवेंद्र भुजबळ.

Devendra Bhujbal
Devendra Bhujbalhttps://newsstorytoday.com
Contact Me : +919869484800 Mail Me : devendrabhujbal4760@gmail.com
RELATED ARTICLES

21 COMMENTS

  1. काॉमा हे पुस्तक नक्कीच आरोग्यासाठी आणि व्याधींशी झुंज देणार्‍यांसाठी दीपस्तंभच !
    अलकाताई तुम्हाला निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!!

  2. Congratulations! 🙏🏼

    Sister Alka Jee, A Great Warrior In India and
    Brother Devendra Jee A Great Facilitator Of India.

    They Both have inspired into my life and in helping me to motivation through the stories of real life people, that has helped me to come out of my comfortable position to take uncomfortable action steps for moving forward in my life and business.

    I Wish Them All The Best In Their Life and Business.
    Thanks and Best Wishes 🙏🏼

    Dr. Anil Kumar Nagdev

    “The World’s Most Indigenous Online Business Ecosystem Consultant and Wellness Coach In The World.”
    Father of 2 Wonderful Children, Married To A Lovely Woman,
    Founder of SmartMindED Educational Ecosystem Portal and Curator Articulator of Online Lifestyle Business Formula,
    On a Mission To Build and Develop SmartMinds Community of 1 Million Like Minds of Knowledge, Information and Wisdom Givers To Get Ahead In Their Life and Business By Helping, Empowering, Inspiring and Enriching Them For Their Digital Transformations So They Can Grow and Reach Fast, Maximize Their Profits and Income, Get Their Appointments Overbooked, and Easily Create An Impact In This World To Build Their Legacy Business For Future and To Achieve Freedom in Life. 🙏🏼

  3. आरोग्य दिनानिमित्त,अलका तुझ्यावर आलेल्या आजारावर तू मात करून, विजय मिळवलास.हया तुझ्या धैर्यास, व त्यावेळी तुझे पती देवेंद्रसर, मुलगी देवेश्री, तसेच सकारात्मक तुला लाभलेले डॉक्टरस, तुझ्या पाठीशी उभा राहिलेला एमटीएनएल मित्र परिवार, यांस माझा त्रिवार सलाम !
    सुंदर शब्दात सारी उपयुक्त माहीती लिहिली आहेस ! खूप मस्त !
    अशीच सर्वांनी स्वतःची, कुटुंबाची, मित्र परिवाराची व समाजाची काळजी घ्या.

    सौ.वर्षा म.भाबल.

  4. खुपच प्रेरणादायी अनुभव आहे. कँसरग्रस्त महिलासाठी फारच उपयुक्त माहीती आहे. Feeling proud to be your friend.

  5. 💐 अरे वा फारच छान ! अलका मॅडम तुमचे कौतुक करावे तितके कमीच.
    साथीनो ! या अलका भुजबळ मॅडमनी 1992 मध्ये रायगड प्रदक्षिणा मोहिम पूर्ण केली. चार वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सर झाला. त्यावर मात करून त्यांनी स्वल्पविराम हे पुस्तक लिहिले. 37 वर्षे सेवा करून त्यांनी एम टी एन एल मधून वेल्फेअर इंस्पेकटर पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली. आता त्या कराओके कार्यक्रम करतात आणि आज मॅडमना कजरा मूहबतवाला या सुमधूर गीतावर नृत्य करताना पाहिले. माझे मन आनंदीत झाले. आपण कुठे ही कमी नाही हेच मॅडमनी या ठिकाणी दाखवून दिले.
    मॅडम, पुढील वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा.- अनिल चाळके, गिर्यारोहक,अंबरनाथ.

  6. मॅडम, हा लेख वाचून तुमच्या आजारपणा बद्दल समजले. तुमच्या इच्छा शक्तीला आणि आत्मविश्वासाला सलाम.
    तुम्ही कॅसर पेशंटला आत्मविश्वास व धीर देण्याचे जे काम करत आहात त्या बद्दल तुमचे ऋण व कौतुक.
    👍💐
    मकरंद

  7. Great 🙏🙏

    नेहमी हसतमुख असणाऱ्या, आपलेपणाने बोलणाऱ्या, प्रत्येक कार्यक्रमात उत्साहाने भाग घेणाऱ्या, अलका मॅडम तुमचा प्रवास आमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

    जागतिक आरोग्य दिनानिमित्त तुम्हाला मनापासून शुभेच्छा 🙏💐💐
    सुजाता काळे –

  8. अलका प्रथम तुझे मनःपूर्वक अभिनंदन👍👍👍👍आजच्या जागतिक आरोग्य दिनी तुला सुंदर आयुष्य लाभो या शुभेच्छा🙏🙏 ज्या परिस्थितीत तू या गंभीर आजारावर मात करून जी जन जागृती केलीस त्यास त्रिवार सलाम👌👌असेच साहित्य तुझ्याकडून प्रस्तुत होवो आणि त्याचा आस्वाद आम्हाला मिळो हीच आजच्या दिनी तुला शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐शुभ रात्री🙏🙏
    वनिता कर्कलमाट्टी – MTNL

  9. आज जागतिक आरोग्य दिना निमित्त आपण आपले आरोग्य, आपल्या हाती बाबत मौल्यवान सूचना केल्याबद्दल तसेच आपणास झालेला गंभीर आजार व त्यास दिलेल्या खंबीर धैर्यशील लढ्यास सलाम. आपला लढा इतर गरजूसाठी प्रेरणादायी ठरो. साहित्यातील आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏
    मोहन आरोटे – MTNL

  10. अलकताई, तुमचया जिद्दीला
    साक्षात दण्डवत

    dr रेखा डावर तुमच्या
    आणि कुटुंबाच्या पाठीशी
    खम्बिर पणे उभ्या राहिल्या
    त्यांनाही माझ्यातर्फे शुभेच्छा

    बोट दुखायला लागतात
    क्षणभर विश्रांती आणि मग
    उर्वरीत संवाद करेन

    मनात बोलण्याजोगे भरपूर
    आहे

    – प्रकाश पळशीकर ,दिल्ली.

  11. 👍खूपच कमी शब्दांत चांगली माहिती अभिनंदन आमची एमटीएनएल मधील लोकप्रिय आणि प्रेमळ मैत्रिण आणि मिडिया मँन देवेन्द्रजी आणि अलका भुजबळ धन्यवाद🙏🏼💐
    ँ- सुरेखा पाटील,मुंबई.

  12. *आदरणीय सौ.अलकाताई आणि देवेंद्रजी भुजबळ आपले मनःपूर्वक अभिनंदन!*
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    *”आपलं आरोग्य आपल्या हाती”*

    *यामध्ये जागतिक आरोग्य दिनानिमित्त आपण काँमा लघुपटा मधून सौभाग्यवती अलकाताई यांचे जीवन चरित्र कथन केले आणि सदरचा लघुपट राज्याचे राज्यपाल मा.भगतसिंग कोश्यागिर यांचे हस्ते सन्मानित करून आपणास फार मोठा बहुमान प्राप्त झाला, यासारखे भाग्य नाही. आपण मनापासून केलेल्या कार्याला मानाचा मुजरा!*👏👏
    *आपले कार्य म्हणजे…*

    *Service to man is service to God !*

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    *आपले कार्य समजालाच भूषणावह नाही तर आपल्या राज्याला, देशाला, व समस्त मानव जातीला भूषणावह व प्रेरणादायी आहे.*
    👏👏👏🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
    *देवापुढे लावलेल्या नंदादीपाप्रमाणे आपण जनमानसात स्नेह दीप लावून त्यांच्या दुर्धर आजारावर मात केली हे आपलं भाग्य. संवाद काँमा या पुस्तकाच्या माध्यमातून आपले कार्य जनमानसात पोहचवले या बद्दल आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन*
    💐💐💐💐💐💐
    *आपल्या जीवनात असेच आनंदी व निरामय आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी चरणी प्रार्थना*
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    *पुढील कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा !*

    🌹*आदरणीय सौ.अलकाताई आणि देवेंद्रजी भुजबळ आपले मनःपूर्वक अभिनंदन!*
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    *”आपलं आरोग्य आपल्या हाती”*

    *यामध्ये जागतिक आरोग्य दिनानिमित्त आपण काँमा लघुपटा मधून सौभाग्यवती अलकाताई यांचे जीवन चरित्र कथन केले आणि सदरचा लघुपट राज्याचे राज्यपाल मा.भगतसिंग कोश्यागिर यांचे हस्ते सन्मानित करून आपणास फार मोठा बहुमान प्राप्त झाला, यासारखे भाग्य नाही. आपण मनापासून केलेल्या कार्याला मानाचा मुजरा!*👏👏
    *आपले कार्य म्हणजे…*

    *Service to man is service to God !*

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    *आपले कार्य समजालाच भूषणावह नाही तर आपल्या राज्याला, देशाला, व समस्त मानव जातीला भूषणावह व प्रेरणादायी आहे.*
    👏👏👏🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
    *देवापुढे लावलेल्या नंदादीपाप्रमाणे आपण जनमानसात स्नेह दीप लावून त्यांच्या दुर्धर आजारावर मात केली हे आपलं भाग्य. संवाद काँमा या पुस्तकाच्या माध्यमातून आपले कार्य जनमानसात पोहचवले या बद्दल आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन*
    💐💐💐💐💐💐
    *आपल्या जीवनात असेच आनंदी व निरामय आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी चरणी प्रार्थना*
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    *पुढील कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा !*
    – *-कृष्णकांत सासवडे,पिंपरी,पुणे.
    🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻

  13. आज खूप वर्ष्याने एक मैत्रीण भेटली
    तशी आहे खूप सानिध्यातील
    पण आमच्या विभागीय बदल्या होत असल्याने थोड्या दूर होतो.
    नावाने अलका असलेली
    उदार मतवादी, सुंदर अशी
    सदा हसतमुख असणारी ही छबी👍👍👍
    छान कार्यप्रणाली तिची
    नेहमी सुवासिक अशी फुलं माळणारी👌👌
    छान लांबसडक केशसंभार तिचा👍👍
    अश्यातच एक दिवस कोण जाणे काय होते नियतीच्या मनात
    जे कोणी ही त्यातून नाही सुटलेले
    झाला होता एक गंभीर आजार
    पण या अलकाने त्यावर केली मात
    प्राणपणाने दिला लढा👍👍
    मुलगी आणि पती यांच्या अधिपत्याखाली त्यांच्या सेवेने
    आणि डॉक्टरांनी केलेल्या उपचाराने ती पुनः झाली ताठ👍👍
    त्या अवधीत स्वतः वर आलेल्या प्रसंगाचा दुःखद आणि सुखद अनुभव लिहून एक साहित्य साकारले
    त्या साहित्याचे नाव कॉमा
    खरंच कल्पनेच्याही पलीकडले👍👍
    दुर्धर आजारातून बरी होत जन जागृती करणे हे तूच करू शकते अलका🙏🙏🙏🙏
    त्याचा किती लोकांना उपयोग होत आहे,अशी स्फुर्ती देवाने तुला देऊन नक्कीच तुला पुनर्जन्म बहाल केले आहे🙏🙏अभिमान आहे आम्हाला अशी सखी आम्हाला लाभल्याचा👌👌👌
    आज जागतिक आरोग्य दिनी
    तुला मंगलमयी शुभेच्छा💐💐💐💐💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?