Saturday, March 15, 2025
Homeसाहित्यआपलं पोर्टल : काही कविता

आपलं पोर्टल : काही कविता

आपल्या न्युज स्टोरी टूडे वेबपोर्टल ला आज ३ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने पुढे काही कविता देत आहे. या सर्व कवींचे मनःपुर्वक आभार.
– संपादक

१.

ऐका न्युज स्टोरी टूडे ची कथा
देश विदेशातील लोकांची ही गाथा

बी रोवले देवश्री ने
बहरले या जोडीच्या परिश्रमाने

संपादक निर्मितीची ही जोडी
सर्वांचा तोल सांभाळते ही होडी

भुजबळ सरांचे सकारात्मक तत्व
अलका ताईंचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

सर्वांनाच ज्यांनी मंत्रमुग्ध केले
वटवृक्षात आज रूपांतर झाले

नाविन्याची ध्यास, प्रयत्नांची कास
वाचकांसाठी ही मेजवानी कमखास

लेखक व कवींचे हे कुटुंब
जणू वर्षानुवर्षांचे ऋणानुबंध

लेखणीला एक हक्काचे व्यासपीठ
वाचकांसाठी अनोखे ज्ञानपीठ

कथा कविता असे बरेच काही
येथे कशाचीही कमी नाही

प्रबोधन, प्रोत्साहन गंमती जंमती
प्रेरणा, परिचय लहान थोर ही रमती

परंपरेला आधुनिकतेची जोड
न्युज स्टोरी टुडेला न कोणती तोड

कला गुणांना मिळते बळ
न्यूज स्टोरी चे जेव्हा लाभते पाठबळ

अदृश्य यशाचा हा जिना
न्युज स्टोरी टुडे चा अद्भुत खजिना

न्यूज स्टोरी ची टुडे जणू साहित्यिकांची ढाल…..
अखंड तेवत राहो ही मशाल
अखंड तेवत राहो ही मशाल.

रश्मी हेडे

— रचना : रश्मी हेडे.

२.
काव्य लिहितात सारस्वत
देवेंद्र सरांचा
अभिप्राय मस्त

देश विदेशात
मिळतो न्याय
कर्तव्यदक्षतेत
अती प्रशस्त

आशेचा किरण लुकलुकतो
न्यूज स्टोरी टुडेत
कविता आली

आनंदाला येते
कसे उधान
जणू कविता
प्रज्ञावंत झाली

बालका समान
मोद भरे मनी
रचना भिडते

जणू नभांगनी
आनंदाचे फवारे उडतात
अन् काव्य शोभते नंदनवनी

देवेंद्र सरांपुढे आकाश ठेंगणे
अलकाची साथ
हास्याचे कोंदण

दिव्यत्वाच्या प्रचितीत फुलते
भासे पंढरीच्या विठोबाचे अंगण

काव्याचे रहस्य
सांगती विदेशी
हळूच वाटते
करावी चौकशी

सरांची बघावी
बालकासम वाट

लक्ष्मी नारायणाचा वेगळाच थाट
सारस्वतांच्या काव्यास शोभे भाट

आली रे आली
न्युज स्टोरी ची गाडी
उत्स्फूर्तपणे पाहतात सारीच वाट

अशीच मिळावी
जगभर प्रसिध्दी
व्हावा एक दिवस
वटवृक्ष सुंदर

आम्ही आपल्या
वृक्षाच्या छायेत
त्यात नित्य दिसावे
रुप मनोहर

शोभा कोठावदे

— रचना : सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई

३.
असे माध्यम लाभले आम्हास न्यूज स्टोरी टुडे।
देश विदेशातील संस्कृती, परंपरा, भौगोलिक ज्ञान आले पुढे।

कवी मनाच्या प्रतिभा झाल्या जागृत
सुंदर कविता आल्या पुढे।

सखोल ज्ञानाचा कण वेचूनी लेखक आले पुढे
देशोदेशीची कला साहित्य आले पुढे।

खेळ खेळाडूचे कौतूक होऊ लागले
खरे बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांची माहिती आली पुढे।

गृहिणीची विशेष, खाद्य संस्कृती,
मायेने रुचकर पदार्थ आले पुढे।

बालकलाकारांचे कौतुक आले पुढे
आयुर्वेदाचा खजिना वैद्यांनी आणला पुढे।
ऋषी मुनींचे वेदही देतात नव्या पिढीसाठी सखोल माहिती आली पुढे।

धन्य धन्य ते सुरेख संपादक, निर्माता कल्पना सुचली जनसेवेची,
न्युज स्टोरी टुडे गेली सातासमुद्रापार गडे।

खरी निःस्वार्थ सेवा गडे आनंदी आनंद ज्ञान गडे वाचकही झाले ज्ञानी गडे असे न्युज स्टोरी टुडे।

सुरेखा रासने.

— रचना : सौ सुरेखा रासने. संगमनेर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. कवितेंची मस्त मेजवानी….
    वेब पोर्टल वर….वेब पोर्टलची….

  2. News story portal च्या वर्धापनदिनानिमित्त केलेली सुंदर रचना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments