नमस्कार.
आपण ज्या गावात, शहरात जन्मतो, वाढतो किंवा स्थायिक होतो त्या गावाचा, शहराचा आपल्याला अभिमान वाटतो. ईतरांपेक्षा आपलं गाव कसं छान, चांगले, वैशिष्ट्यपूर्ण आहे, हे तर आपण सर्वांना ऐकवत असतो, प्रसंगी लिहू शकणारे त्यावर लिहितातही.
भले काही लोकं एखाद्या गावाची, शहराची टिंगल टवाळी, चेष्टा मस्करी करीत असतील तरी आपापल्या गावांचा सार्थ अभिमान आपल्याला असतोच आणि तो असलाही पाहिजे. म्हणूनच म्हणताना आपण सहजपणे म्हणतो आम्ही मुंबईकर, आम्ही पुणेकर, आम्ही इंदूरकर, आम्ही बेळगावकर, आम्ही …. ..
आता तर कित्येक मराठी बंधू, भगिनी परदेशात स्थायिक झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यापैकी कुणी असंही म्हणत असतील, *आम्ही लंडनकर, आम्ही न्यूयॉर्ककर, आम्ही सिडनीकर, सिंगापूरकर तर आश्चर्य वाटायला नको !
तर घ्या आपला मोबाईल आणि करा टाईप आपल्या गावाविषयी/शहराविषयी आणि..…. पाठवा आमच्याकडे +91 9869484800 या मोबाईल वर वा devendrabhujbal4760@gmail.com या ईमेलवर. आपल्या लिखाणासोबत आपल्या गावाची/ शहराची काही छायाचित्रे व स्वतःचे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र अवश्य पाठवा.
निवडलेल्या लिखाणास www.marathi.newsstorytoday.com या वेब पोर्टलवर व शक्य झाल्यास पुढे इतर माध्यमातून प्रसिद्धी देण्यात येईल.
उद्या वाचा आम्ही ठाणेकर……..
शुभेच्छांसह…
आपला स्नेहांकित,
देवेंद्र भुजबळ.
संपादक
www.marathi.newsstorytoday.com