Friday, August 8, 2025
Homeलेखआम्ही वडाळाकर...

आम्ही वडाळाकर…

संत तुकाराम महाराजांचे चरणस्पर्श, ज्या भूमीला लागले, ते ‘विठ्ठलाचे प्रतिपंढरपूर‘ म्हणून आमचे वडाळा ओळखल्या जाते……..

मुंबई शहराचा मध्य बिंदू म्हणजेच वडाळा गाव ! हार्बर रेल्वेचा मध्य बिंदू म्हणजे जंक्शन-वडाळा रेल्वे स्टेशन

माझा बराचसा पूर्वार्ध, वडाळ्यात गेला. वडाळा पूर्व, तीस वर्षापूर्वीचा पाहिला तर, अतिशय अविकसित भाग. खाडीने व्यापलेला, त्यात तयार होणारी मिठागरे. मिठाचे ढीग, त्यावेळी मी पाहिले होते.

येथील मूळ लोक आगरी जे मिठाची देखरेख करीत असत. ऐतिहासिक मिठाचा सत्याग्रह येथेच झाला होता. त्यावरून ‘वडाळा मिठागर‘ हे नाव प्रसिद्धीस आले.

हळूहळू मध्यम वर्गीय, विविध जातीय लोकांनी तेथील जागा अडवणे पद्धतीनुसार काठ्या उभ्या केल्या. त्यावर मातीचा भरणा करून लहान-लहान झोपड्या उभ्या केल्या. त्यातच त्यांनी आपले संसार थाटले.

बघता बघता वडाळा खाडीचा भाग, झोपड्यांनी व्यापून टाकला. तेथील काही भाग कलेक्टरच्या मालकीचाही आहे. त्यावर मोठमोठे टाटा वीज पॉवरच्या तारा अक्षरशः झोपड्यांच्या छतावरून गेलेल्या आजही दिसतात. धोका असूनही वडाळा प्रेमी लोक हा भाग सोडू इच्छित नाहीत. हेच चित्र आजही दिसते.

वडाळा पूर्व भाग सखल असल्याने, पावसात होणारा पाण्याचा त्रास, कित्येक लोकांनी अनुभवला आहे. घरा-घरात, गटार मिश्रित पाणी शिरत असे. दोन-तीन दिवस, या पाण्याचा निचरा होण्यास लागत असे. टॉयलेट- बाथरूम या सारख्या गोष्टींचा, लोकांना त्रास सहन करावा लागे.
पावसाच्या दिवसात खाडीच्या पाण्याची पातळी वाढल्याने, प्रवाहासोबत खूप प्रमाणात मासेही येथे मिळत असत. खेकडा पकडण्यासाठी, आजही काही लोक, खाडीमध्ये जातात व त्यावर आपली उपजीविका करताना दिसतात.

हळूहळू हा भाग राजकारणी लोकांच्या दृष्टीस आला असावा. कुठेतरी एखादया सार्वजनिक नळाऐवजी अनेक नळांची सोय उपलब्ध झाली. कच्च्या घरांचे पक्क्या घरांत रूपांतर झाले. पायवाटा दिसेनाशा झाल्या. त्या जागी, नव्वद फूटी रस्ते तयार झाले. ‘होम पाईप्स’, कृष्णा स्टिल नावाच्या कंपनी पूर्वी प्रसिद्ध होती. ती हटवून त्याजागी दोस्ती एकर नावाच्या मनोरी इमारतींची वसाहत उभी राहिली.

बरासचा भाग, वडाळा मध्ये, बी.पी.टी.च्या मालकीचा असून तेथे बी.पी.टी वसाहत पाहावयास मिळते. न्हावा-शेवा समुद्री महामार्ग येथून तयार होत आहे. विशिष्ट महिन्यात फ्लेमिंगो पक्षांचे थवे, येथेच पर्यटक पहावयास येतात. गोदरेज कंपनी आजही तुम्हाला येथे पहायला मिळेल. हळूहळू विजेच्या समस्यांचे निवारण झाले.

वडाळा हायवे सायन-पनवेलला जाऊन मिळाल्याने, येथे भक्तीपार्क नावाची वसाहत भव्य दिव्य वाटते. येथील घुमटाकार आयमॅक्स चित्रपटगृह देखनीय आहे. त्या विरुध्द बाजूस बी.के.सी हब नावाने ‘वडाळा’ हा गाव प्रसिध्दीस पोहचेल.

प्रीमियर ऑटो लिमिटेड कंपनी ऐवजी त्या जागी विद्यालंकार महाविद्यालय इंजिनिअरिंग शिक्षणास, वडाळाकार भाग्यशाली ठरले. थोडक्यात, वडाळा पूर्व विभाग वेगाने विकासाकडे झेपावला. आज वडाळ्याला मोनोरेल धावताना दिसते, 

उड्डाण पुलांचे नाविन्य या भूमीत मोठ्या प्रमाणात उभारण्यात आले, वडाळयातील फ्री हायवे शहरी विकासाचे उत्तम उदाहरण आहे.

वडाळा अँटॉप हिल हा विभागही आज खूप विकसित झालेला दिसतो. हळूहळू झोपड्या जाऊन, पुनर्विकास इमारती उभ्या राहिल्या. दहा×दहा च्या खोलीत वर्षानुवर्षे खीतपत आयुष्य काढणारा वडाळाकर आता उंच उंच मनोऱ्याच्या इमारतींत वास्तव करू लागला आहे.

‘वडाळा पश्चिम’ भाग तसा पूर्वीपासूनच विकसित होता. एस.आय.डब्ल्यू.एस. महाविद्यालय, आंबेडकर महाविद्यालय, बन्सीधर हायस्कूल, सिताराम हायस्कूल,  मराठी मध्यमवर्गीयांचे विश्वसनीय ज्ञानेश्वर हायस्कूल खूप प्रसिद्ध आहेत. खात्यापित्या धंदेवाईक लोकांची या भागात वस्ती दिसून येते.

डॉन बॉस्को ही शाळा व बाल आश्रम अगदी वाखाणण्या सारखा आहे. बाजूलाच वडाळा मार्केट नावाची प्रसिध्द असलेली बाजार पेठ, लागूनच पारसी कॉलोनी आहे व त्यात उगम झालेले पाच उद्यान यांचा  (फाइव गार्डेन) नयनरम्य नजारा ! अप्रतीम !

अनेक इंग्रजी शाळा ‘वडाळा’ क्षेत्रात दिसून येतात. काही वर्षापूर्वी कुष्ठ रोग्यांसाठी सुरू केलेले इस्पितल आज ॲक्वर्थ म्युनसिपल हॉस्पिटल या नावाने उभे राहिले आहे. शासकीय मान्यता प्राप्त असलेले व्ही जे टी आय ह्याच भूमीत प्रसिद्ध आहे.

‘वडाळा’ भागास लागूनच परेल व दादर ही मोठी क्षेत्रे जोडली गेलेली आहेत. विविधतेने प्रसिध्द असलेला विभाग, अनेक जातीय धर्मांच्या माणसासाठी, जिव्हाळ्याचा विभाग आहे.

संत तुकाराम महाराजांचे चरणस्पर्श, ज्या भूमीला लागले, ते ‘विठ्ठलाचे प्रतिपंढरपूर’ म्हणून ‘आमचे वडाळा’ ओळखल्या जाते.
ॐ श्री विठ्ठल- रखुमाईस माझा साष्टांग नमस्कार !

वर्षा भाबल.

– लेखन : सौ.वर्षा महेंद्र भाबल.
– संपादन : अलका भुजबळ.  9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on पांढरी काठी : प्रशिक्षण संपन्न
Dr.Satish Shirsath on अनुवादित कथा
सौ. सुनीता फडणीस on श्रावण : काही कविता
सौ. सुनीता फडणीस on काही भक्ती रचना