काही समजून घ्यायचं, उणीवा प्रत्येकात,
मीच केवळ शहाणा, नाहीच मुळी जगात,
आपल्या उणीवा सांभाळून, वागायचं आहे,
हीच खरी आयुष्याची गंमत आहे,
काही तुझे काही माझे उणिवांचे नाते,
चांगले काही, वाईट काही दोघांमध्ये होते,
तरीही समजून घेऊन, आनंदाच्या भाळी,
सुख दुःख सोबत घेऊन, वाजवायची टाळी,
नक्की काय हवं आहे, नेमकं कुणा ना कळतं,
काही मिळेल अजून या आशेवर आयुष्य जातं,
काही स्वप्न पूर्ण होतात, काही ती अधुरी,
स्वप्नात सोबत कधी करते रेखा नी माधुरी,
समजून घेऊन, स्वप्न पाहून, सत्य स्वीकारायचं आहे,
हीच खरी आयुष्याची गंमत आहे…!!!

— रचना : हेमंत भिडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
