आपलेच आपण असतो
कोणी बरोबर नसताना ।
कोडी आयुष्याने घातली
संधी हवी सोडविताना ।।१।।
मोहकता साऱ्या जगातली
गुलाबाच्या फुलासारखी ।
पण त्यालाही काट्यांची संगत
असावी रक्षणकर्त्यासारखी ।।२।।
संकटांना घालावे कुंपण
पैसाही होतसे कारण ।
जपून रहावे मनानेे तसे
दुःखांना ना करावे धारण ।।३।।
कर्म प्रत्येकाचे वेगळे
फळ असते त्याचे तसे ।
मृगजळ सुखाचे येता
जगावे संयमाने जसे ।।४।।
सुखदुःखही नसे शाश्वत
मोह कशाचा नका करु ।
आयुष्य विनापेक्ष जगता
आपण भवसागरी तरु ।।५।।

— रचना : अरुण पुराणिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800