Home बातम्या आरोग्य विज्ञान विद्यापीठ : कुलगुरूपदी ले. ज. डॉ. माधुरी कानिटकर

आरोग्य विज्ञान विद्यापीठ : कुलगुरूपदी ले. ज. डॉ. माधुरी कानिटकर

0

नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी, लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी राजीव कानिटकर यांची राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज, मंगळवार, दि. ६ जुलै रोजी नियुक्ती जाहीर केली.

या विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा कार्यकाळ नियत वयोमानानुसार १० फेब्रुवारी २०२१ पूर्ण झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांचेकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी ओरिसा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती न्या. कल्पेश झवेरी यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती.

दिल्लीच्या अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे (एम्स) महासंचालक डॉ. रणदीप गुलेरिया व राज्याच्या वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय हे निवड समितीचे सदस्य होते.

अल्प परिचय

लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर या सध्या एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (DCDIS) (Medical) म्हणून नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत.

ले. ज. डॉ माधुरी कानिटकर यांनी सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथून प्रथम क्रमांकाने एमबीबीएस पदवी प्राप्त केली आहे. तर बालरोगशास्त्र या विषयात एमडी केले आहे. २०१७ ते २०१९ या काळात सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता म्हणून त्यांनी काम केले असून त्यांना अध्यापन व संशोधनाचा एकूण २२ वर्षांचा अनुभव आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे २००८ साली त्यांना सर्वोत्तम शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले होते.

– टीम एनएसटी, 9869484800.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version