महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नवनिर्वाचित कुलगुरू, निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ माधुरी कानिटकर यांनी कुलगुरू पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नुकताच माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधून विद्यापीठाची नवी दिशा स्पष्ट केली. पाहू या काही ठळक मुद्दे….
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना होऊन 23 वर्षे झाली. आज विद्यापीठाशी विविध आरोग्य शास्त्र शाखांची 421 महाविद्यालये संलग्नित आहेत.
पदवी, पदव्युत्तर, फेलोशिप अशा विविध अभ्यासक्रमांच्या सुमारे 75000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या परीक्षा, विद्यापीठातर्फे घेतल्या जातात.
अत्याधुनिक संशोधन क्षमता वाढवतांना स्थानिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी संशोधन आणि नवकल्पनांची व्याप्ती वाढविणे यावर यापुढे विद्यापीठाचा अधिक भर असणार आहे.
ऽ सामर्थ्य:
1. विविध शाखांमधून मोठ्या संख्येने संलग्नित महाविद्यालये
2. नाशिकच्या आरोग्यदायी हवामानात उत्कृष्ट पायाभूत सुविधा
3. भविष्यातील दिशा ठरवण्यासाठी वचनबद्ध व्यवस्थापन परिषद आणि सिनेटसह सर्व अधिकार मंडळे
4. शैक्षणिक, संशोधन आणि प्रशासकीय अनुभव असलेले वचनबद्ध कर्मचारी
5. देशातील काही सर्वाेत्तम महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्नित आहेत.
6. शास्त्रीय दृष्टीकोन असलेले विद्यार्थी आणि शिक्षकवर्ग
7. घालून दिलेल्या कार्यपद्धती आणि प्रक्रियांचा मजबूत पाया
8. देशात नेतृत्व करणारे विद्यापीठ
ऽ संधी
1. आपल्या राज्याच्या गरजांना अनुसरून अभ्यासक्रम विकसित करणे. विशेषतः ग्रामीण आणि अविकसित शहरांमध्ये समस्या हाताळण्यास सक्षम असलेले मनुष्यबळ विकसित करणे.
2. युनिव्हर्सिटी कॅम्पस श्रेणी सुधारित करण्यासाठी आणि विद्यापीठाच्या कॅम्पस आणि विभागीय केंद्रांमध्ये पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रीन कॅम्पस उपक्रम.
3. विद्यापीठाच्या छत्राखाली सर्टिफिकेट/फेलोशिप अभ्यासक्रम, बॅचलर, मास्टर, डॉक्टरेट आणि पोस्ट-डॉक्टरल, ड्युअल डिग्री प्रोग्राम यांसारख्या अनेक प्रवेश आणि निर्गमनासह एक समग्र एकात्मिक बहु-विद्याशाखीय कार्यक्रम विकसित करण्याचा प्रयत्न.
4. कार्यक्षमता वाढविण्यासाठी सर्व प्रक्रियांचे ऑटोमेशन.
5. ई-लर्निंग सुविधांचा वापर.
6. आंतरविद्याशाखीय संशोधनावर अधिक भर.
7. विद्यार्थी आणि समाजासाठी उपयुक्त आणि अर्थपूर्ण अशा नव्या अभ्यासक्रमांचा विचार.
8. भारतातील आणि परदेशातील इतर विद्यापीठे आणि संस्थांशी सहयोग.
9. विद्यार्थी कल्याण विविध योजना अधिक सक्षम करणे.
10. फॅकल्टी डेव्हपलमेंट प्रोग्राम.
ऽ भविष्यातील योजना
(अ) नवीन पदव्युत्तर महाविद्यालय.
(ब) तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे शिक्षणातील गुणवत्ता वाढविणे.
(क) सर्व प्रक्रियांचे ऑटोमेशन.
(ड) आंतर विद्याशाखा संशोधनावर भर.
(इ) कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी मानव संसाधन आणि विद्यार्थी कल्याण उपक्रम.
(फ) विद्यापीठ परिसराची सुधारणा – ग्रीन कॅम्पस करणे.
(ग) विभागीय केंद्रांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे.
उपरोक्त प्रमाणे ठरविण्यात आलेल्या नव्या दिशेमुळे हे विद्यापीठ निश्चितच अधिक काल सुसंगत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव लौकिक मिळविणारे ठरेल, असा विश्वास आहे.
– लेखन : देवेंद्र भुजबळ. 9869484800