आल्या गौरी ग सुवर्णकांती ल्याल्या
भाग्यशाली ग परिवाराला झाल्या..॥धृ॥
सुंदर किती रूप हे बाई
गौराई आल्यात सोन्याच्या पायी
सजले घर सजले दार
नऊवारी नेसून
नटली नार
अलंकारांनी सुंदर सजल्या..
आल्या गौरी ग.. ॥१॥
पक्वान्ने बनली किती ही बाई
साजरी सुंदर ती रोषणाई
प्रसन्न मुख हासती किती
पापणी कडेत नाती नि गोती
जेवल्या पक्वान्ने, पक्वान्ने जेवल्या
आल्या गौरी ग..॥२॥
जेवून गौरी सुखावल्याहो
घराला लागला सोन्याचा पाओ
निरोपाची हो झाली तयारी
नयना लागल्या झारी नि धारी
वरदायिनी आनंदे हासल्या
आल्या गौरी ग ..॥३॥
— रचना : प्रा.सौ.सुमती पवार. इंग्लंड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800