भारतीय संस्कृतीत आपण दिवाळी नवीन कपडे, मिठाई, पंचपक्वान्न, घेऊन, भव्यदिव्य रोषनाई करून साजरी करतो.
परंतु अकोला येथील गायत्री बालिका आश्रम, सूर्य उदय बालगृह येथील चिमुकले, शिवापूरच्या
वृद्धाश्रमातील मातृ पितृ समान वयोवृद्धांची दिवाळी साजरी करण्याकरिता, दरवर्षी प्रमाणे आस्था योग फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी, योग साधक यांनी पुढाकार घेऊन त्यांना तेल, डाळ, तांदूळ, फळे, दिवाळीचा फराळ वाटप करून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली.
प्रारंभी प्रियंका टाले यांनी गायत्री बालिका आश्रमाची, प्रशांत देशमुख यांनी सूर्योदय बालगृहाची, ईश्वर गावंडे यांनी शिवापुर वृद्धाश्रमाची माहिती दिली.
यावेळी जय मला खेडेकर, अश्विन, अविनाश कुंभार, चंद्रकांत अवचार यांनी बालकांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला सुभाष तायडे, राजकुमार तडस, विष्णू सूर्यवंशी, प्रशांत खांबलकर ,कविता अंबाडकर, छाया इंगळे, माधवी देशमाने ,प्रकाश रणबावरे, मनोहर दहीवाले, उद्धव धांडे, संगीता इंगोले, निखिल इंगोले, शोभा घुगे, श्रीमती राऊत, दिलीप बोरकर, अंविका लाहोळे, सारा लाहोळे, अनेश्वर ईडोळे, वर्षा मोरे, श्रीधर मेतकर, रेणुका कुंभार, डॉक्टर हेमंत पद्मने, मायाताई तिजारे, श्रीवस्ती तिजारे, मनीषा भुसारी, प्रेमा काटे, संगीता विभुते, संजय गावंडे, विनोद देशमुख, माधव काठोळे, अर्पिता डोळे, समृद्धी कुंभार, श्रीधर मेटकर व बहुसंख्य योग साधक उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी विनोद लाहोळे, गिरी, संदीप रूपनारायण, उद्धव धांडे, कुंभार, कल्पना खेडेकर, राजेंद्र भातुलकर, कुलकर्णी अश्विनी चौरपगार, काकड, शिवाजी चव्हाण मनोहर दिवनाले यांनी अनंत परिश्रम घेतले व कार्यक्रमाची शोभा वाढवली.

– लेखन : किशोर विभूते
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800