आकाशीचा ढग सावळा
जणू माझा इठू वाटतो
खाली येता येता कसा
गोरा होऊन बरसतो
वेड्या भक्तांसाठी असा
विठू नटरंगी नटतो
भोळ्या भक्ता भेटाया
जणू आषाढी साधतो
आषाढीची खास वारी
रोज हिरवाईत दिसे
जीव लावता त्यावरी
वाट पंढरीची हसे
देव असे पावसात
कधी तापल्या उन्हात
रुसल्या रुक्मिणीला
मोगरा अत्तर देई खास
येता खुशीत रुक्मिणी
येई जाईजुईला बहर
प्रेम इठूचे कळता
पिके जांभळाचा घड
शेला घेऊनी भरजरी
उभा केव्हाचा विटेवरी
जा भेटाया सत्वरी
चिंध्या का शोधी दूरवरी
कधी भेटेना मंदिरात
बसला मनाच्या खिडकीत
जरा दार उघडुनी
मारा आसुसून हाक
– रचना : मोहना कारखानीस, सिंगापूर
अतिसुंदर
विजूताई