इस्काॅनतर्फे दि.१९ ते २१ दरम्यान भारतव्यापी युवा महोत्सव….
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त इस्काॅनतर्फे शनिवार दि.१९ ते सोमवार २१ जून २०२१ दरम्यान भारतव्यापी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात भारतभरातील २५ लाख युवक सहभागी होणार असून युवकांना या महोत्सवात सहभागी होण्याकरिता मोफत नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. युवकांचा विश्वविक्रमी सहभाग असणारा हा महोत्सव इस्काॅनचे कार्य युवा पिढीत रूजवण्यास उपयुक्त ठरणार आहे, असे नगर येथील इस्काॅन मंदिराचे व्यवस्थापक श्री. गिरीवरधारी दास यांनी सांगितले.
ते म्हणाले, इस्काॅनतर्फे आयोजित करण्यात आलेला हा राष्ट्रीय युवा महोत्सव ‘इन्स्पायरो २०२१‘ या नावाने संपन्न होणार आहे.

श्रीमद् भगवतगीता आजच्या संगणक युगातही कुटूंबव्यवस्था, शिक्षण, उद्योग, व्यवसाय अशा सर्व जीवनोपयोगी क्षेत्रास कशी उपयुक्त आहे ? हे या महोत्सवयातील वक्त्यांच्या मार्गदर्शनामधून स्पष्ट होईल. भारतीय संस्कृतीमध्ये भक्तीला विज्ञानाचा कसा आधार आहे ? हे वक्त्यांच्या व्याख्यानांमधील अनेकविध उदाहरणे दाखवून देतील.
- शनिवार दि.१९ जून २०२१ ला सायंकाळी ७ ते रात्री ८.३० या वेळेत मेंबर ऑफ फोर्ट चॅरिटीज श्री.अल्फ्रेड बी फोर्ड यांचे ‘इस्ट मिटस् वेस्ट‘ या विषयावर इंग्रजीमधून व्याख्यान होईल.
- रविवार दि.२० जून २०२१ ला दुपारी १२ ते २ या वेळेत फाउंडर ऍण्ड सीईओ, बडा बिझनेसचे श्री. डाॅ.विवेक बिंद्रा यांचे ‘बिझनेस योगा फ्राॅम भगवतगीता’ या विषयावर हिंदीमधून व्याख्यान होईल.
- सोमवार दि.२१ जून २०२१ ला सायंकाळी ७ ते रात्री ८.३० या वेळेत व्हाइस क्लबचे डायरेक्टर आणि भक्ती योगा टिचर श्री. राधेशामजी दास , एम.टेक. आयआयटी, मुंबई यांचे ‘डिस्कव्हर युवर सेल्फ‘ या विषयावर इंग्रजीमधून व्याख्यान होईल.
इस्काॅनच्या या ऑनलाईन महोत्सवात सहभागी झालेल्या युवकांमध्ये ऑनलाईन स्पर्धा घेण्यात येऊन विविध आकर्षक बक्षिसांची भेट देण्याचेही खास नियोजन करण्यात आले आहे.
युवकांनी www.giversclub.in या वेबसाईटवर विनामूल्य नोंदणी करून या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. गिरीवरधारी दास यांनी केले आहे.
– लेखन : मिलिंद चवंडके
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.