Thursday, March 5, 2026
Homeबातम्या'एकटीच या वळणावर' : राज्यस्तरीय पुरस्कार

‘एकटीच या वळणावर’ : राज्यस्तरीय पुरस्कार

अहमदनगर जवळील केडगाव येथील डॉ. शारदा निर्मळ – महांडुळे यांच्या ‘एकटीच या वळणावर‘ या कथासंग्रहास शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, बुलढाणा यांचा ‘तापी पूर्णा उत्कृष्ट प्रेरणादायी कथासंग्रह
हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष शिवचरण उज्जैनकर यांनी नुकतीच दिली.

पुस्तक परिचय
अचानक आलेल्या वैधव्यानंतर एकल महिलांनी आयुष्यात उभारी कशी घ्यावी, यासाठी प्रेरणादायी प्रवास केलेल्या महिलांच्या कथा ‘एकटीच या वळणावर’ या कथासंग्रहात आहेत. सर्वच महिलांनी आणि मुलींनी जीवनात संकटाशी सामना करण्याची हिंमत येण्यासाठी हे पुस्तक वाचनीय आहे. समाजातील प्रत्येक महिलेने स्वावलंबी असणं ही काळाची गरज आहे. संकट आल्यावर कोलमडून पडण्यापेक्षा बालवयापासून मुलींना खंबीर आणि स्वावलंबी बनवावे. यासाठी हा कथा संग्रह वाचनीय आणि प्रेरणादायी आहे.

अभिप्राय
समाजातील उपेक्षित घटकावर इतके सुंदर आणि उभारी घेणारे लिखाण मी पहिल्यांदाच वाचलं आणि महत्त्वाचे म्हणजे पद्मभूषण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. त्यामुळे ‘एकटीच या वळणावर‘ या कथासंग्रहाची निवड, उत्कृष्ट प्रेरणादायी कथासंग्रह साहित्य पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.

असे निवड समिती आणि संस्थेचे अध्यक्ष शिवचरण उजैनकर यांनी सांगितले. फाउंडेशनचे उपाध्यक्ष तथा ग्रामीण लेखक निंबाजी हिवरकर, प्रा. विनायक वाडेकर, सचिव साहित्यिक प्रमोद पिवटे, संचालिका जयश्री नितीन भोंबे, साहित्यिक जयवंत बोदडे, संचालक संतोष ठाकूर या निवड समितीने या पुरस्कारांची निवड केली.

हा पुरस्कार मिळाल्यामुळे डॉ. शारदा महांडुळे यांच्यावर साहित्यिक आणि वैद्यकीय क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

– लेखन : देवेंद्र भुजबळ 9869484800.

Devendra Bhujbal
Devendra Bhujbalhttps://newsstorytoday.com
Contact Me : +919869484800 Mail Me : devendrabhujbal4760@gmail.com
RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. नमस्कार मित्रांनो,

    समाजातील विधवा आणि उपेक्षित महिलांनी त्यांच्या जीवनात आलेल्या एकटेपणाला मोठ्या धैर्याने सामोरे जाण्यासाठी प्रेरणा देणारे “एकटी या वळणावर” हे डॉ. शारदा महांडुळे यांनी लिहिलेले पुस्तक कथासंग्रह अतिशय प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल असा विश्वास वाटतो. डॉ शारदा महांडुळे यांचे मनःपूर्वक अभिनंदन !!

    राजाराम जाधव

  2. सुंदर पुस्तकाची आपणा कडून मिळाली. नेहमीच मिळते. धन्यवाद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Vedvati Kulkarni on झेप : 14
Swati Naik on अभंग : ओढ
मृदुला राजे on ऋतुराज वसंत
विनित वैद्य on जिचे तिचे आकाश…: ९