Thursday, September 18, 2025
Homeसाहित्यओठावरलं गाणं

ओठावरलं गाणं

नमस्कार🙏 ओठावरलं गाणं या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मन: पूर्वक स्वागत. रेडिओवर लागणारी काही काही गाणी पूर्वी वारंवार लागत असत. ती गाणी ऐकायला आली कि अंगात वीरश्री संचारते.

काही काही गाणी मात्र एखाद्या गोष्टीचं आयुष्यात असलेलं महत्त्व अधोरेखित करतात. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेल्या या गाण्यातून श्रमदानाचं महत्व सांगितलं आहे. गाण्याचे शब्द आहेत –

उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी
जय श्रमदेवी जय श्रमदेवी जय श्रमदेवी कृपा करी

लक्ष्मी म्हणजे धनदेवता ! पण ही देवता सहजगत्या प्रसन्न होत नाही. “तुझा कृपाशिर्वाद सदैव माझ्यावर राहू दे” अशी नुसती तिची प्रार्थना करून ती प्रसन्न होत नाही. आपल्याला तिला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर आपण काहीतरी उद्योग, काहीतरी कामधंदा करायला हवा. तो उद्योग जर यशस्वी कारायचा असेल तर आपल्या कामावर श्रद्धा हवी. श्रध्दा आणि श्रम जर इमानेइतबारे केले तर ही देवता प्रसन्न व्हायला वेळ लागणार नाही.

दुर्दैवाचे पहाड फोडू
अमोल दौलत खणूनी काढू
मातीमधूनी सोने लपले धरणीच्या उदरी

कितीही संकटांचे अथवा दुर्दैवाचे पहाड आमच्यासमोर उभे राहिले तरीही न डगमगता आम्ही कष्टांची शर्थ करून आमच्या परिश्रमाने संकटांचं रूपांतर संधीत करू. श्रमदेवीची मनापासून पूजा करून कर्तव्याची मोट बांधू म्हणजे धरणीशी एकरूप झालेल्या या मातीमधून तिच्या उदरात लपलेलं सोनं श्रमदेवी आम्हाला देईल.

उभ्या पिकाची हिरवी पाती
कणसामधूनी जपले मोती
खळ्यात पडल्या डोंगरराशी लुटू या दौलत खरी

आम्ही श्रमदेवतेवर विश्वास ठेवून काम केलं आणि आमच्या श्रमाचा मोबदला आम्हाला मिळत गेला. कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा न करता आम्ही जमिनीत पेरलेलं बी या मातीनं घट्ट धरून ठेवलं. आभाळातून वरूणराजाने आभाळातून पाठवलेल्या जलसंजीवनीमुळे ही धरणी आणि मातीदेखील संतुष्ट झाली. आम्ही पेरलेल्या बी बियाण्यातून प्रत्येक शेतावर आलेल्या पिकाची हिरवीगार पाती पहाता पहाता वाऱ्यावर डोलायला लागली. आमच्या श्रमाचं चीज होत असलेलं पाहून पुढची कामंही दुप्पट श्रमानं झाली आणि या मातीनं दामदुपटीने त्याचं फळ आमच्या पदरात टाकलं. कणसाचे दाणे म्हणजे जणू काही टपोरे मोती वाटावे अशी जगावेगळी दौलत गोळा करताना “देता किती घेशील दो कराने” अशी अवस्था झाली आहे. खरोखरच श्रमदेवीची लिला अगाध आहे ‌… तिच्या पूजेला पर्याय नाही.

दैव आमुचे आम्ही घडविले
भाग्यदान हे पदरी पडले
जगावेगळे वास्तुशिल्प हे कृष्णाची नगरी

नेत्रदानानंतर सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे श्रमदान! श्रमदानातून आम्ही भक्तीभावाने श्रमदेवीची पूजा बांधली आणि आमच्या दुर्दैवाचं रूपांतर सुदैवात करण्यामधे आम्ही यशस्वी ठरलो. श्रमदेवीच्या कृपेने आमच्या श्रमाचा मोबदला म्हणून दामदुपटीने हे भाग्याचं दान आमच्या पदरात पडलंय. खळ्यांमधून दिसणा-या या धान्याच्या राशी म्हणजे जणूकाही वास्तूशिल्पाचा एक जगावेगळा नमुना तयार झाला आहे. असं म्हणतात कि श्रीकृष्णाच्या द्वारका नगरीत सौख्य आणि समाधान हातात हात घालून नांदत होते. या धान्याच्या राशी पाहून आमच्या मनाला मिळणारं समाधान देखील तेव्हढ्याच किंवा त्याहूनही अधिक किंमती आहे जे श्रमदेवतेच्या कृपेने साकार झालं आहे ‌कष्ट आणि परिश्रमांची महती अधोरेखित करणारं हे गाणं “थांब लक्ष्मी कुंकू लावते” या चित्रपटासाठी प्रभाकर जोग यांनी संगीतबध्द केलं असून आशा भोसले आणि सहकारी यांच्या आवाजात हे स्फूर्ती गीत ऐकताना आपल्याही अंगागातून स्फूर्ती ची लहर दौडत जाते.

विकास मधुसूदन भावे

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी या गाण्याचे रसग्रहण सुंदर रितीने उलगडून दाखविले आहे. धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा