बोलणे तव गोड असू दे,
पैसे येतील आणि जातील,
नात्यात ओलावा असू दे,
माणसे पुन्हापुन्हा भेटतील,
तुझ्यासोबत रहावं असं,
काहीतरी खास दिसावं,
तू ह्रदयाने नी तृप्त मनाने,
सतत श्रीमंतच असावं,
अल्पसा सहवास लाभला,
त्यातून जी प्रेमवेल फुलली,
जपून वाढवी नाजूक आहे,
कठोर शब्दांनी होते हळवी,
तु येतांना स्वागत झाले,
तू जातांनाही ते व्हावे,
असे खरे तूज वाटते ना?
मग तू केवळ प्रेमळ व्हावे….
– रचना : हेमंत भिडे. जळगाव.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
मस्त कविता 👌👌👌