Wednesday, October 15, 2025

कथा

“आउसी गोस्ट”

बोली भाषा हे आपले सांस्कृतिक वैभव आहे. ते जपल्या जावे, वृद्धींगत व्हावे, असा आपल्या पोर्टलचा नेहमीच प्रयत्न असतो. या प्रयत्नाचा भाग म्हणून आज आपण आगरी बोलीतील कथा वाचू या. इतर बोलीतील कथांचे, कवितांचेही स्वागतच आहे.
— संपादक

हरी शेटला कोनीतरी आशिरवाद दिला व्हता. ‘अष्टपुत्र लाभो’, ते आशिरवादानी त्याला चार पोरी, चार पाॅरा झालती. समद्यांची लग्ना केल्यावं हरीशेट हरी हरी करित स्वरगान ज्याला. त्याचे मक्षी सिरकोला जमिन जेली. पाॅरावी जमिनीचं पैसं वाटून झेतलं. मक्षी सारेबाराचं पलाट आयलं, ते इकलं त्याचं पैसं वाटून झेतलं.

मोठे भावासची बायको पनवेलची, तो पनवेलला रावाला जेला. दोन नंबरचे भावासची बायको उरणची, तो उरणला रावाला जेला. तिस-याची बायको डोंबवलीची, तो डोंबवलीला रावाला ज्याला. चौथ्याची बायको कोपरखैरण्याची, तो तया रावाला जेला. आता त्यांची आस राधाबाय एकटीच गावानचे घरान रवली व्हती. घरान वडिलोपार्जित गंपती व्हता, वायलं निगल्यापासून पयला गंपती उस्ताव आयला. राधाबायनी समदा चंगला केला तरी चारभावान भांगर झाली. त्यान ठरला का गंपतीची वाटणी करा. पैशाची वाटनी केली त्याचा राधाबायला कय वाटला नय. पून बापूस जेल्यामुलं गंपतीची वाटनी तिचे जिव्हा-यान लागला. ती धायमोकली लराला लागली. पुन ते चारजनांना कय दया आली नय.

पनवेलला मोठ्याचं करं गंपती जेला. राधाबाय गावठी भाजी, पापर, खारव-या, लोनचा, केलीची पाना झेवून रिक्षा करून जेली. तया फ्लॅटमधी गंपती, जागा कमी, मूर्तीसुदा बारकी व्हती. भाऊस- बैनीस जमल्या व्हत्या. पून गावानचा एकसुदा मानूस तया नव्हता. राधाबायला चुकल्यासारखा वाटला. हरीशेट हासताना अर्दा गाव आरतीला घरान जमाचा. दोन पाट्या भात जेवनाला पुरं नसं. आया जेमतेम ज्यावान व्हता. आरती झाल्यावर बाकी भाऊस, बैनीस परत जेलं. राधाबाय तया राली पुन तिचा जीव रमत नव्हता कारण गंपतीसमोर फे-यांची नाचगानी नव्हती, बाल्यानाच नव्हता, आरतीला ढोलकी नव्हती. यो गंपती उत्सोव राधाबायला आवारला नय. त्यान धा दिवसाचा गंपती मोठ्यानी पाच दिवसान बुरवला. तवा तल्यावं राधाबाय मुसमुसून लरत व्हती. तिनी तंशीच रिक्षा करून आपला गावघर गाठला व्हता. तिनी हाय खाली व्हती, त्यान ती शिक परली व्हती.

गावांचे जुने चारपाखी कौलारू बंगल्यान राधाबाय मनान तलमलत व्हती. हरी शेटचे फोटो करं बगून ती दिस कारीत व्हती. धष्टपुष्ट राधाबाय बोंबलासारकी वालली व्हती. ती आता काठी धरून थरथरत चालत व्हती. जीव जात नव्हता म्हगून जगत होती. रिक्षावाल्यानी पोरांना सांगल्यावं ती आसला भेटाला आयली. ते बतं ‘आमी चौघंजन तुजी वाटनी करताव. दोन दोन मैनं तू आमचं करं रावाला ये. आमी तुजा सगला करू.’ त्या ऐकून राधाबायनी ते सगल्याना हात जोरलं नं घाबरून आपलं डोलं फिरवलं. तिनी कय डोलं उगीरलच नय.

गज आनन म्हात्रे

— लेखन : गज आनन म्हात्रे. करावे गाव, नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. गज आनन यांनी आगरी भाषेतील साज चढवून
    राधाबाय… जीव जात न्हवता म्हगून जगत होती…. तिनी कय दोलं उकिरलच नाय! अशा शब्दांत चित्र उभे केले.
    गज आनन, आपण आमच्या घरी समक्ष भेटीमुळे आपुलकी वाढली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप