Thursday, January 30, 2025
Homeयशकथाकलासक्त रायमा, कलासक्त आईबाबा

कलासक्त रायमा, कलासक्त आईबाबा

नाशिक येथील अवघ्या ५ वर्षाची बालगायिका रायमा शेख ‘पिहु’ हिची चिल्ड्रेन बुक ऑफ रेकॉर्ड्सने नोंद घेतली आहे.

लता मंगेशकर यांची मराठी, हिंदी, उर्दू, संस्कृत, गुजराथी, कोंकणी, भोजपुरी, इंग्रजी, इंडोनेशियन, तमिळ, मल्याळम, राजस्थानी अशा तब्बल 12 विविध भाषांमधील ५० हून जास्त गाणी आपल्या गोड आवाजात अस्खलितपणे गाणारी भारतातली सर्वात लहान बालगायिका हा विक्रम रायमाच्या नावावर चिल्ड्रेन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदला गेला आहे.

जिंदगी प्यार का गीत है, ये समा (हिंदी), विठ्ठल तो आला-आला (मराठी), माजे राणी माजे मोगा (कोंकणी) बेकस पे करम किजिये (उर्दू), श्रीरामचंद्र कृपालु भज (संस्कृत), वैष्णव जन तो (गुजराथी), ए चंदा मामा, आरे आव पारे आव (भोजपुरी) यू नीडेड मी (इंग्रजी), दी तेपी पान्ताय ( इंडोनेशियन), आरारो आरारो नीवेरो नन्वेरो (तमिळ), कदली कन्कदली चेंकदली (मल्याळम), थाने काई काई बोल सुणावा म्हारा सांवरा गिरधारी ( राजस्थानी) अशी यापूर्वी लतादीदींनी अजरामर केलेली विविध गाणी अत्यंत आत्मविश्वासाने, तालासुरात गाणा-या रायमाला तिची आई वृषाली शेख यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

छोटी रायमा लतादिदींची मोठी चाहती असून वयाच्या दुस-या वर्षांपासूनच तिने गायला सुरुवात केली. अनेक कार्यक्रमांमध्ये सुरेल गायन करून रायमा रसिकांची मने जिंकत असते. रायमा सोशियल मिडियावरही अत्यंत प्रसिध्द असून तिने गायलेल्या गाण्यांची झलक आपण New Miracle Production या चॅनेलच्या https://youtu.be/UW9Fweu9iwk या युट्यूब लिंक वर पाहू शकता.

https://www.facebook.com/1126579264094678/posts/5413810222038206/

रायमाने नुकताच रवींद्रनाथ विद्यालयात सिनियर केजीत प्रवेश घेतला असून अभ्यासातही तिला खूप गती आहे.
अतिशय कमी वयातल्या या पराक्रमाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कलासक्त कुटुंब
रायमाला कलासक्त कुटुंबाचा वारसा लाला आहे. तिचे वडील रज्जाक शेख ‘राही’ निसर्गोपचार डॉक्टर असून त्यांचे पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. कलासक्त वडलांचा वारसा मिळालेल्या शेख यांनी महाविद्यालयीन जीवनातच काव्यलेखन व पत्रकारितेला आरंभ केला. विविध वृत्तवाहिन्यांसाठी, वृत्तपत्रांसाठी कार्य करतानाच 1999 साली आकाशवाणी, नाशिक केंद्रावर नैमित्तिक उद्घोषक म्हणून सुरुवात केली. याच दरम्यान अभिव्यक्ति संस्थेसाठी प्रोडक्शन असिस्टंटपदी कार्य करताना विविध माहितीपटांची निर्मिती केली .

2005 साली स्वत:च्या ‘मिरॅकल’ ॲड एजन्सीची स्थापना करून विविध व्यावसायिक तसेच शासकीय योजनांची आकाशवाणीच्या विविध केंद्रांवरून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी केली व करताहेत. तसेच विविध लघुपट व इतर अनेक कार्यक्रमांची निर्मिती केली आहे. शेख मराठी सोबत हिंदीतूनही काव्यलेखन करतात. त्यांचा ‘गगनामधले तारे’ हा काव्यसंग्रह महाराष्ट्र शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित झाला आहे.

रायमाची आई वृषाली शेख, पूर्वाश्रमीची वृषाली गुजराथी, ही विश्वातील पहिली आणि एकमेव अंध रेडियो स्टार अँकर असून ती मोटीवेशनल स्पीकर, कवयित्री, गायिका, संगीतकार, सामाजिक कार्यकर्ती आहे. तिने एमएसडब्ल्यू, एनडी, या पदव्या प्राप्त केल्या आहेत.

त्यांना पुढील महत्वाचे सन्मान मिळाले आहेत :-
महाराष्ट्र शासनातार्फे सामाजिक कार्यासाठी दिला जाणारा, डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार 2 मार्च 2019 केन्द्रीय मंत्र्यांच्या हस्ते

 प्रतिष्ठित लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस व गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये राष्ट्रीय व जागतिक विक्रमाची नोंद. विविध मान्यवरांकडून सन्मानपत्र.

 जागतिक महिला दिनानिमित्त दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर रात्री साडे नऊच्या बातम्यांमध्ये स्वाती पाटणकर यांच्या द्वारे 8 मार्च 2016 रोजी मुलाखत

 शारदा बहुद्देशिय संस्थेद्वारा ‘यमुनाई पुरस्कार’ 9 मार्च 2015

 ऑल इंडिया स्त्री हित असोसिएशन मुंबईतर्फे ‘आयेशा जागतिक कर्तृत्ववान अंध महिला पुरस्कार’   9 मार्च 2014

 सर्वधर्मप्रतिष्ठान नाशिक तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक कार्यातील मौलिक योगदानाबद्दल सन्मान 8 मार्च 2014

 कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाचा ‘ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ 3 जाने. 2012

 अप्पर पोलिस महासंचालक, मुंबई
श्री. उध्दव कांबळे यांच्या हस्ते नेहरू युवा केंद्राचा ‘जिल्हा युवा पुरस्कार 2006’

 तत्कालीन नाशिक जिल्हाधिकारी श्री. चोक्कलिंगम यांच्या हस्ते, युवा शक्ती सामाजिक संस्थेचा राज्यस्तरीय ‘समाजप्रबोधन पुरस्कार 2007’

 तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. संजय चहांदे यांच्या हस्ते नाशिक महानगरपालिकेतर्फे नाशिक भूषण पुरस्कार 2006

 तत्कालीन महापौर व माजी आमदार श्री. बाळासाहेब सानप यांच्या हस्ते युवाभारती सेवा समितीतर्फे ‘राज्यस्तरीय युवागौरव पुरस्कार’ 2010
व इतर अनेक सन्मान

• सामाजिक कार्यातील योगदान :-
 क्रिएटिव्ह माइंड फाऊंडेशन ट्रस्ट, लोकविकास सा. संस्था, महिला हक्क संरक्षण संस्था व इतर
संस्थांसोबत गेली अनेक वर्षे पर्यावरण रक्षण, महिला सबलीकरण, मनुष्यबळ विकासासाठी विविध प्रशिक्षणसत्रांचे आयोजन.

समाजाताल्या दुर्लक्षित घटकांसाठी मोफत काऊन्सलिंग व इतर विविध सामाजिक उपक्रम.

 आकाशवाणी केंद्रांसाठी अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रमांची निर्मिती, निवेदन, सादरीकरण व त्याद्वारे श्रोत्यांसाठी जनसंघटनाचा आगळावेगळा प्रयोग
उदा. मिरॅकल मस्ती, मिरॅकल मसाला, ज्ञानरंगोली, फॅशन धमाका, कायदा सर्वांसाठी, गुरूकृपा दहावी अभ्यासमाला, मैत्री तुमची आमची, फ्लायोक्रिटचा आधार; करी घरकुलाचे स्वप्न साकार, गुलिस्ताने गजल, जपूया पार्यावरण करूया सामाजिक वनीकरण, कायद्याचा आधार, कामे घ्या नरेगाची चिंता मिटेल रोजगाराची, आई होताना इ.

नाशिक येथे २०१२ ते २०१४ असे तीन वर्षे विभागीय माहिती उपसंचालक म्हणून काम करताना मी या दोघांचे कार्य जवळून पाहिले आहे.खरोखरच हे कुटुंब केवळ नाशिकचेच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रासाठी भूषण असून सर्वांनी त्यांचा आदर्श बाळगला पाहिजे असे आहे.
या सर्व परिवाराला त्यांच्या भावी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा

देवेंद्र भुजबळ

– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. खुपचं छान रायमा आणि तिच्या आईबाबांचेही खुप कौतूक रायमाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🌹🌹🙏🙏🙏

  2. खूपच छान. रायमा आणि आई बाबांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments