Homeसाहित्यपाऊस सरी....

पाऊस सरी….

बरसून गेल्या पाऊस सरी
नाते नव नवीन फुलवीत
काळाकुट्ट मेघ अंधार व्यापतो
पाऊस सर येते मेघ झुलवीत….१

घनगर्द झाडीत पक्षी किलबिले
ओल्या रेतीत नक्षी चितारली
सागर किनाऱ्यावरती जाता
नाव येऊन उभी ठाकली…..२

गीत गाणे झालेय चांदण्यांचे
चंद्र ढगाआडून उजळला
काळोख्या रात्रीतून त्याने
नभांगणी नवा डाव खेळला…..३

अशी आसंमत व्यापून गेली रात
लख्ख प्रकाश पाडे चंद्र नभी
वाट पाहत पाहत जागलेली
चंद्रकोर एकली दारात उभी…..४

माधवी ढवळे

– रचना : सौ माधवी ढवळे. राजापूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr. Surekha Vivek Joshi on माझी जीवन नौका : 2
सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : 2
प्रज्ञा आठल्ये on “आशा भोसले”
निलकंठ घिवारे on माझी जीवन नौका : 2
निलकंठ घिवारे on माझी जीवन नौका : 1
कांचन दळवी on माझी जीवन नौका : 2
राघवेंद्र कुलकर्णी on माझी जीवन नौका : 2