Home बातम्या कळणारे वळण्यासाठीही गोळी निघावी ! – देवेंद्र भुजबळ

कळणारे वळण्यासाठीही गोळी निघावी ! – देवेंद्र भुजबळ

1

सकस, योग्य आहार घ्यावा, नियमित व्यायाम करावा, व्यसने करू नये अशा सर्व गोष्टी माणसाला कळत असतात पण त्या प्रत्यक्षात सर्वांकडून होत नाही, ही खरी समस्या आहे. त्यामुळे अशा कळणाऱ्या गोष्टी वळण्यासाठीही औषधांच्या गोळी सारखी गोळी निघावी आणि केवळ डॉक्टरच नाही तर लेखक, संशोधक असलेल्या डॉ विनायक हिंगणे यांनीच या कामी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा न्यूज स्टोरी टुडे चे संपादक देवेंद्र भुजबळ यांनी व्यक्त केली. ते डॉ विनायक हिंगणे यांनी लिहिलेल्या “क्रेविंग : खाण्याचे व्यसन” या पुस्तकाच्या नुकत्याच झालेल्या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते.

देवेंद्र भुजबळ

श्री भुजबळ पुढे म्हणाले की, एकीकडे आर्थिक, भौतिक प्रगती होत असताना, दुसरीकडे शारीरिक, मानसिक आरोग्याच्या नवनवीन समस्या निर्माण होत आहेत. या सर्वांचा कसा मुकाबला करायचा हा मोठा प्रश्न आहे. पण आपण सकस, नियमित,योग्य आहार, व्यायाम, ध्यान धारणा अशा बाबी नियमितपणे करीत राहिल्यास, कठीण परिस्थितीवर मात करीत राहू. डॉ विनायक हिंगणे यांनी खाण्याला व्यसन संबोधून, अती खाण्याचे किती, कसे दुष्परिणाम होतात, याकडे लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे, हे पुस्तक त्यांनी स्वतःवर प्रयोग करून, अन्य रुग्णांचा अभ्यास करून लिहिले असल्यामुळे ते अनुभवजन्य असे सांगून त्यांनी डॉ विनायक हिंगणे यांचे अभिनंदन केले.

डॉ राजेंद्र आगरकर

सोसायटी फॅार प्रिव्हेन्शन ऑफ हायपरटेन्शन अँड डायबेटिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेंद्र आगरकर यांनी आपल्या भाषणात डॉ विनायक हिंगणे यांच्या कार्याचे व पुस्तकाचे महत्त्व विशद केले.तसेच लंडन मध्ये 7 वर्षे राहिल्या नंतर, पुढे तिथेच स्थायिक न होता, आपल्या बुलडाणा या जन्मगावी ते आरोग्य सेवा देत आहेत, या बद्दल त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढले.

डॉ विनायक हिंगणे

यावेळी डॉ विनायक हिंगणे यांनी पॉवर पॉईंट च्या साहाय्याने मधुमेह, रक्तदाब, आहार या विषयी केलेले साध्या सोप्या भाषेतील मार्ग दर्शन उपस्थितांना खूपच भावले. पुस्तक लिहिण्यामागील भूमिका सांगताना त्यांनी डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या रुग्ण घेतात पण त्यांनी सांगितलेली योग्य जीवन शैली अंगिकारत नाहीत, म्हणून समस्या कायम राहतात, असे प्रतिपादन केले.

डॉ हेमंत जोशी

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वर्षा जोशी यांनी केले. तर डॉ हेमंत जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमास बालरोग तज्ज्ञ डॉ. अर्चना जोशी, डॉक्टर रेणुका जोशी, सौ राधिका जोशी- शर्मा,  IIT इंजिनिअर अजिंक्य गवी, कवी शांतीलाल ननावरे, माहिती विभागाचे निवृत्त वरिष्ठ सहायक संचालक श्री निरंजन राऊत, विविध मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

1 COMMENT

  1. आजचे आरोग्याचे प्रश्न खूप जटील झाले आहेत. आज पेशंट नाच आपली आरामदायी जीवनशैली सोडायची नही. ती तशीच ठेऊन गोळी खाल्ली की आपले आजार बरे व्हावेत अशी त्यांची अपेक्षा असते. त्यात प्रत्येक pathy च्या मर्यादा त्या त्या pathy मधील doctors सुद्धा पाळत नाहीत आणि काही अनावश्यक औषधे आयुष्यभर घेतली जातात ज्याने पुढे जटील व भयंकर रोगाला आपण आमंत्रण देत असतो हे पेशंट ना माहित करून दिले जात नाही किंवा दिलेच तरी पेशंट त्याकडे दुर्लक्ष करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version