समरसता साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेने आयोजित केलेल्या “स्व. विजयराव कापरे स्मृती काव्य करंडक स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारोपातील अध्यक्षीय भाषणात बोलताना कवी, नाट्यकर्मी श्री रमेश वाकनीस म्हणाले की, “कधी कधी सुमार असणाऱ्या कविता सुद्धा चांगल्या सादरीकरणाने उजव्या ठरतात आणि चांगल्या कविता देखील सादरीकरणातील उणिवा मुळे लोकांपर्यत पोहचत नाहीत. सादरीकरण कसे करावे याचेही शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. चांगल्या कवींनी ही कला शिकून घ्यावी आणि चांगल्या प्रकारे कवितांचे सादरीकरण करावे”.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मा सुरेश लुणावत, जेष्ठ साहित्यिक मा पुरुषोत्तम सदाफुले, स्पर्धेचे परिक्षक मा.वर्षा बेडिगेरी कुलकर्णी, दुसरे परिक्षक श्री अनिल आठलेकर आणि श्री राजेंद्र भागवत हे व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री. लुणावत म्हणाले “कोणीतरी एकच जण स्पर्धा जिंकतो म्हणून इतरांनी नाराज व्हायचे नसते, पुढे जिंकण्यासाठी तयारीस लागायचे असते.” दोन्ही परीक्षकांनी आपल्या मनोगतातून कवींच्या सादरीकरणातील गुणदोष सोदाहरण दाखवून दिले.
या प्रसंगी उद्योजक मा अभय पोकर्णा, सौ मीनाताई पोकर्णा, हास्यकवी आनंदराव मुळुक यांचा सन्मान करण्यात आला.
या वर्षीचा स्व विजयराव कापरे स्मृती काव्य करंडक सांगलीच्या “चारुता” या संघाने जिंकला.
स्पर्धेचा संपूर्ण निकाल खालील प्रमाणे :
सांघिक :
प्रथम – चारुता ( सांगली )
द्वितीय – बहावा ( चिंचवड )
तृतीय – शब्दगंध ( चिंचवड )
वैयक्तिक पुरस्कार : –
काव्यलेखन-
प्रथम – यश सोनार ( बहावा )
द्वितीय -अभिजित काळे ( गझलपुष्प)
तृतीय- अनिल नाटेकर (काव्यसरिता )
सादरीकरण –
प्रथम- शुभदा पाटणकर ( चारुता )
द्वितीय- अवधूत पटवर्धन (कोलाज)
तृतीय- पल्लवी भागवत
(काव्यकस्तुरी)
सूत्रसंचालन / निवेदन –
प्रथम – शुभदा दामले ( बहावा )
द्वितीय – प्राची हर्षे ( कोलाज )
तृतीय – सुनिल अधाटे ( टाटा मोटर्स -१ )
श्रीमती शोभा जोशी, कैलास भैरट, जयश्री श्रीखंडे, निलेश शेंबेकर, श्रद्धा चटप, मानसी चिटणीस, बाळासाहेब सुबंध, सुरेश जोशी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.सुहास घुमरे यांनी सूत्रसंचालन केले आणि उज्वला केळकर यांनी आभार मानले.
— लेखन : बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800