कविता होती प्रतिसादासाठी
मित्रांच्या काव्य भावनांना दिलेल्या प्रत्युत्तराची
सुचत गेले तसा व्यक्त होत गेलो
कळलेच नाही कधी कवितेच्या प्रांतात गेलो
व्यक्त होत होता भावनांचा कल्लोळ
विचारांच्या गर्तेतून बाहेर पडत होता गोंधळ
कविता माझी नव्हती प्रशंसेची
कधीच नव्हती ती ‘एक नंबर’ची
म्हणूनच तिला नव्हती गेयता
सारे निकष गेले होते लयाला
कोणाला भावली, कोणाला आवडली
कोणी तोंडदेखलं वाहवाही केली
कोणी चक्क तिला डिलिटही केलं
सोप्पं असतं ना एखाद्याला मनातून काढून टाकणं?
मात्र विचारांच्या गोंधळाला दिशा मिळाली
मी माझ्या भावनेला कवितेची जोड दिली
रचना – प्रसाद मोकाशी