नको रेडिओ.. नको तो भसाडा आवाज
नकोच अनेक चॅनलचा रेडिओ…नको मोठमोठा आवाज
नको नको त्या बातम्या.. नको त्या जाहीराती
आणि ते राजकारण
नको.. ऐकायला ते मिनिटां मिनिटांला तो भ्रष्टाचार
नको तो बलात्कार, नी नको तो अत्याचार.
हो …पण ऐकायची आहे मस्त, मंजूळ गाणी..
भारावून टाकणारी …ती भावगीत आणि अभंगवाणी..
कुठे हो मिळतील आता ती ऐकायला…
गेले.. का ते दिन गेले..
असं वाटतंय का… रेडिओ प्रेमींना…तर
मग आहे ती अजुन अविस्मरणीय गाणी..
हो..हो अगदी..सुदंर..सुमधूर..निर्मळ..वाणी..
हो आपल्यातच आहे रोज नवी, रोज ताजी..
मनाला प्रफुल्लित..करणारी..मनाला.. तजेला देणारी..
घेऊ मस्स.. छान मस्त ..कारवा
कुठेही न्या… कुठेही ऐका
हजारो गाणी हिन्दी गाणी, मराठी गाणी
अनेक गायिकांची, अनेक संगीतकारांची.
जुनी गाणी नवीन गाणी, दिवसा गाणी, रात्री गाणी.
नको कुठले विचार नकोच कुठले भार.
मन तृप्त करत संगीतमय दुनियेतली
रसभरित गाणी, भावनात्मक गाणी
मनाला गारवा, ऐकू या कारवा.
छान ..मस्त…चोवीस तास…
मग उशीर कश्याला..सुरू करू
कान सेन होत ऐकता ऐकता गाणी गात जाऊ.
आरश्यात बघून हळूच स्वतःशीच हसून
आजपासून.. आत्ता पासून.
कारवा ऐकायला ..करू या सुरवात.
— रचना : पूर्णिमा शेंडे.
कारवा ची गाणी आणि पुर्णिमा तुझ्या कवितांची पर्वणी अजून काय हवे आयुष्याच्या रम्य काळी !!!!!!