Homeसाहित्यकाही चारोळ्या...

काही चारोळ्या…

१. देश…

जगाला ज्याने दिलेत,
संस्कृतीचे धडे,
आणि शिकवलय,
शून्याचे  कोडे,

तो चार हात करतो,
जो त्याला नडे,
जगाचे लक्ष,
त्या माझ्या महान भारताकडे !

२. सैनिक….

छातीची ढाल करूनी,
उभा असे तो सीमेवरी
तहान, भूक, घरदार,
आपल्यासाठी जो विसरी
लढतांना जो,
स्वत:च्या जिवाची, पर्वा न करी
त्या सैनिकाला प्रणाम,
पूरी भारत जनता  करी !

३. देशभक्ती ……

मी बांधील …
माझ्या देशासाठी,
स्वतंत्र देशाच्या,
स्वच्छ प्रतिमेसाठी…

नियमांत राहून,
कर्तव्य करण्यासाठी
सच्च्या देश प्रेमाने,
देश सेवा करण्यासाठी….

— रचना : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments