Wednesday, February 5, 2025
Homeबातम्याकुठल्या डब्यात काय आहे?

कुठल्या डब्यात काय आहे?

स्वयंपाक करताना, बऱ्याचदा प्रश्न पडतो, की कुठल्या डब्यात काय आहे? मग बरेच डबे उघडून बघितल्यावर हवी असलेली वस्तू मिळते. काही महिला हाताने लिहिलेल्या चिठ्ठ्या डब्यांवर चिकटवतात, तर काही पारदर्शक बरण्या वापरतात. अर्थात डोळस व्यक्तींना इतकी अडचण येत असेल तर अंध व्यक्ती स्वयंपाक घरात कसे बरं काम करत असतील?

डोळस आणि विशेषतः अंध व्यक्तींची ही रोजची होणारी अडचण ओळखून “ब्रेलमॅन ऑफ इंडिया” म्हणून ओळखल्या जाणारे, स्वागत थोरात यांनी कल्पकतेने मार्ग शोधला. तो म्हणजे स्वयंपाक घरात लागणाऱ्या धान्य, कडधान्ये, डाळी, पीठे, मसाले अशा १४८ पदार्थ, जिन्नस ,वस्तूंच्या नावांचे स्टिकर्स तयार केले आहेत. मराठीतील ठळक नावां बरोबरच या स्टिकर्सवर ब्रेल लिपीतही नावे दिली असल्याने अंध बंधू, भगिनींची मोठीच गैरसोय दूर झाली आहे. स्वागत थोरात यांच्या स्पर्शज्ञान या स्वयंसेवी संस्थेने गेलार्ड आर्ट यांच्या सहकार्याने हा उपक्रम हाती घेतला आहे .

ही आता काही फक्त महिलांची जबाबदारी आणि मक्तेदारीही राहिलेली नाही. लॉक डाऊन मध्ये तर सगळ्यांचेच नवनवीन प्रयोग हा नित्याचा भाग झाला आणि अनेक नवनवीन शेफ जन्मास आले. पण पुरुष मंडळी किंवा लेकरे स्वयंपाकघरात जबाबदारीने जरी वागू लागली तरीही काय कुठे आहे? पिवळी डाळ फक्त तुरीचीच नसते…काळा मसाला आणि गरम मसाला नक्की वेगळे कसे ओळखायचे? हे प्रश्न शेवटी गृहिणीच्याच पदरात आले आणि अर्थातच स्वयंपाक घरात शोधाशोध करताना व्हायचे ते गोंधळ झालेच. डोळस लोकांची ही कथा तर अंध लोकांना किती त्रासाचं जात असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी!

स्वयंपाक करू इच्छिणाऱ्या अंध महिला-पुरुषांचा हा त्रास कमी व्हावा त्यांना हवे ते किराणा सामान कशात ठेवले आहे हे समजून चटकन सापडावे यासाठी स्वयंपाकघरातील डबे-बाटल्यांवर लावण्यासाठी पदार्थांची नावे लिहिलेला ब्रेल चिठ्ठी’चा (स्टिकर्स) संच तयार करण्यात आला आहे. या ब्रेल स्टिकर्सच्या संचात धान्य, कडधान्ये, डाळी, वेगवेगळी पीठे, मसाल्याचे पदार्थ यांच्यासह इतरही नेहमीच्या वापरातील १४८ नावांचे स्टिकर्स तयार केले आहेत.

पांढर्‍या पृष्ठभागावर निळ्या रंगातील मराठी देवनागरी अक्षरे व त्यावर पारदर्शक ब्रेल लिपीतील उठावदार ठिपके असल्याने अंधांबरोबरच सर्वसामान्यांनाही या स्टिकर्सचा उपयोग होणार आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीला कोठे काय ठेवले आहे हे सहजासहजी समजू शकणार आहे.

अंध आणि डोळस या दोन्हींना उपयोगी पडतील असे हे स्टिकर्स देशात प्रथमच तयार करण्यात आले आहेत. अंध लोकांसाठी काम करण्यात अग्रेसर असलेल्या, स्वागत थोरात यांच्या संकल्पनेनुसार गेलाॅर्ड आर्ट यांच्या संकल्पनेनुसार, त्यांच्या स्पर्शज्ञान या संस्थेने  त्याचे उत्पादन केले आहे. सौ रश्मी पांढरे यांच्या घरी नुकतेच एका अनौपचारिक कार्यक्रमात या संचाचे अनावरण करण्यात आले. सावी फौंडेशन तर्फे “ना नफा, ना तोटा” या तत्वावर या संचाची विक्री सुरू करण्यात आली आहे. या संचाची किंमत फक्त ११० रुपये असून टपालाने हवे असल्यास १० रुपये अधिक खर्च येईल.अधिक माहितीसाठी खालील कार्यकर्त्यांशी संपर्क साधता येईल.
वीणा ढोले:- +919822215955
शुभांगी पिंगळे:- +919881008126
वनिता देशपांडे:- +918446656800
रश्मी पांढरे:- +919881375076
शिल्पा चंदगडकर:- +919881156620
मोनालिसा विश्वास:- +919004711474
चला तर, आपण हे स्टिकर्स घेऊन स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधू या .

लेखन – देवेंद्र भुजबळ. 9869484800.

Devendra Bhujbal
Devendra Bhujbalhttps://newsstorytoday.com
Contact Me : +919869484800 Mail Me : devendrabhujbal4760@gmail.com
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी