कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील साखर गावातील, सुतारवाडीतील बांधव (१० घरे) दोन दिवसांपूर्वी रात्री निसर्गाच्या प्रकोपासमोर जीवितहानीसह आपले सर्वस्व गमावून बसली आहेत.
पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडीतील ११ जण तर ४ जण तळीये महाड तालुक्यातील मुंबईत जे जे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत
गावाकडची संपर्काची सर्व साधने बंद असल्याने नक्की काय घडलेय यापेक्षा काहीतरी भयंकर घडलंय याचाच अंदाज सर्वांना येत होता. या गावातील ७ जण मृत आणि १० जणांचे संसारच पूर्ण उध्वस्त झाले आहेत.
लोक आपापल्या घरकुला मध्ये गाढ झोपलेले होती. शेतीतील कामे ही संपलेली होती. एका कुशीवर निद्रा घेत असलेल्या माणसांसाठी ही चिरनिद्रा ठरली. त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल असे दुर्दैवी मरण त्यांच्या वाट्याला आले आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण सर्वजण एकमेकांना संवेदना अन माणुसकीला मदतीची हाक देऊ या. या कुटुंबाना जी प्राथमिक मदत करण्यासारखी आहे, त्यासाठी प्रथम पाऊल उचलू या ! यासाठी ज्यांना यथाशक्ती जी आर्थिक मदत करता येईल ती तातडीने पुढील अकाऊंट वर पाठवावी ही विनंती.
आपली मदत संकटग्रस्थाना त्यांच्या पायावर पुन्हा एकदा उभे करण्यासाठी किंवा सावरण्यासाठी पुढचे पाऊल ठरेल अशी आशा करू या. समाजातील आपण बांधवांना माणुसकी आणि दातृत्वाचा दिलदारपणा दाखवण्याची हीच वेळ आहे.संस्कारांची पोचपावती देण्याचीही हीच वेळ आहे… चला तर मग कामाला लागूयात…सारं विसरून माणूस होऊयात…
–– साखर ग्रामस्थ मंडळ
————————————-
बँकेचा तपशील
Account Name Details
MALUSARE BANDHU AIKYVARDHAK MANDAL
Bank : Mumbai District Central Co-op. Bank Ltd.
A/c No : 00191001003007
IFC- MDCB0680019
Branch : Worli
संपर्क – हरीश शेडगे 9029151647
मदतीची पावती बनवून त्याची फोटोकॉपी लगेच पाठवून देऊ, नंतर टपालाने पावती पाठविण्यात येईल. किंवा
खालील नंबर googlepay करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलादपूर – किशोर जाधव (9322646435)
महाड – प्रमोद गोगावले (9819350020)
माणगाव – सचिन रहाणे (9664979382)
मदत कर्त्यांची नावे व रक्कम न्युज स्टोरी टुडे या वेब पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येतील.

आपला विनीत
रवींद्र मालुसरे, अध्यक्ष
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
– संपादक : देवेंद्र भुजबळ +91 9869484800