Home बातम्या कोपरगाव : एकल महिलांना मदत

कोपरगाव : एकल महिलांना मदत

0

कोपरगाव येथील सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान तर्फे पंचायत समिती हॉलमध्ये एकल महिलांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले गेले.

यावेळी बोलताना संस्थेच्या अध्यक्षा संगीता मालकर म्हणाला की, या वर्षी देखील नाशिकच्या मंदा व दिनेश घोडेकर या दांपत्याने संस्थेला १३० विद्यार्थ्यांसाठी ७० डझन वह्यांचे वाटप केले. शैक्षणिक साहित्याअभावी कुठलाही विद्यार्थी शाळाबाह्य राहायला नको हीच तळमळ प्रतिष्ठानची आहे.

गटशिक्षण अधिकारी शबाना शेख मॅडम यांनी यावेळी बोलताना अशी ग्वाही दिली की, कोपरगाव तालुक्यातील कोणत्याही विद्यार्थ्याला काहीही अडचणी आल्यास त्या सोडवण्यासाठी मी मदत करेन. परंतु शिक्षण कोणीही अर्धवट सोडायचे नाही.विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचे. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती बाबत देखील त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी एमबीएच्या शिक्षणासाठी गौरी पोळ या विद्यार्थीनीला शेख मॅडम यांच्याहस्ते लॅपटॉप देण्यात आला. लॅपटॉप मिळाल्यानंतर गौरी म्हणाली की, या कार्यक्रमामुळे मला माझ्या ध्येयाच्या दिशेने जाण्याची प्रेरणा मिळाली. स्वाती मुळे यांनी आभार मानले.

याप्रसंगी लायन्स क्लबचे नवनियुक्त अध्यक्ष मनोज कडू, सचिव डॉ.तुषार गलांडे, डॉ.विजय क्षीरसागर, डॉ.अंकित कृष्णानी,
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस च्या समुपदेशक कविता निकम, एडवोकेट वैशाली झाल्टे, बाल संरक्षण अधिकारी अधिकारी विकास बागुल, प्रतिष्ठानच्या गीता रासकर, छाया गिरमे, सुनिता ससाने उपस्थित होत्या.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version