निसर्गाच्याही सहनशक्तीचा झाला आता उद्रेक
म्हणुनच त्याने पाठवला कोरोना रूपी महाराक्षस एक
किती अहंकार झाला होता माणसाला
मंगळावर घर घेण्याचा बोलत होता
क्लोनने नवा मानव बनवण्याच्या तयारीत होता
पण निसर्गाच्या एका अदृश्य सैनिकाने त्याला भानावर आणले
नव्हे त्याची जागा दाखवली
इटली, अमेरिका सारख्या देशांनीही त्याच्यापुढे नांग्या टाकल्या
तर भारतासारख्या विकसनशील देशाचं काय ?
कुठे गेली ती माणसांची गर्दी
दडी मारून बसले आहे झुंडीच्या झुंडी
रस्ते ओस पडले
गार्डनमध्ये बागडणारी चिमणी पाखरे घरट्यात अडकली
घड्याळ्याच्या काट्यावर चालणारी माणसे चावी नसलेल्या घड्याळासारखी बंद पडली
मॉंल, जिम, ऑफिस, शाळा हे शब्द ऐकू येईनासे झाले
पूर्वी माणूस गर्दीत हरवत होता
आता माणसांची गर्दीच हरवली आहे
या पृथ्वीचा नाश करेल अणू
असे वाटत असतानाच कुठून अचानक आला हा विषाणू?
ग्लोबलायझेशनमुळे जग जवळ आले म्हणतात कोरोनाने माणसांना जवळ आणले
विलगीकरण करून देखील मने विलग नाही झाली
पैशापेक्षा माणूस मोठा हे प्रत्येकाच्या लक्षात आले
या कठीण परिस्थितीत मंदिरातील नाही तर माणसातील देवावर विश्वास वाढला
डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कामगार हे देवदूत झाले
निसर्गाची एप्रिल महिन्यातील बॅलन्स शीट चालू आहे
शे-दोनशे नाहीतर हजारो माणसे दिवसागणिक मरत आहेत
ग्लोबल वार्मिंग या शब्दाचा खरा अर्थ आत्ता कुठे कळत आहे
माणसाने जंगले तोडून घरे बांधली नद्या-नाले तोडून धरणं बांधली
पशुपक्षी प्राण्यांची हत्या केली
चंगळ वादाने माणूस बेभान झाला
पैशाच्या हव्यासापायी नातीगोती विसरला
पण त्या कोरोना नावाच्या शिक्षकाने माणसाला चांगलाच धडा दिला
रचना :- स्मिता लोखंडे.
छान कविता
खूपच छान