काही खाजगी हॉस्पिटल्स कोरोना रुग्णांना अक्षरशः लुटत असतात, अशा बातम्या मनाला खूप वेदना देत असतात. या पार्श्वभूमीवर एक हॉस्पिटल मात्र रुग्णांकडून काहीच पैसे न घेता मोफत ऑक्सिजन उपचार करीत आहे, ही बातमी नक्कीच दिलासादायक आहे.
हे हॉस्पिटल उत्तर प्रदेशातील भदैनी येथील माता आनंदमयी हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये ज्या कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागत आहे, त्यांच्याकडून त्याचे शुल्क आकारले जात नाही. यामुळे या रुग्णांना मोठाच दिलासा मिळत आहे. या हॉस्पिटलच्या या उपक्रमाची माहिती मिळताच प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांनी या हॉस्पिटलला १ लाख रुपयांची मदत केली.
“बच्चे कंपनीचा संदेश”
याशिवाय पौडवाल कुटुंबातील बच्चे कंपनीने स्वतःचा पॉकेटमनी कोरोना कार्यासाठी देऊन एक आदर्श निर्माण केला आहे. या पैश्यातून मुंबईतील जे जे हॉस्पिटलला ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर देण्यात आले आहे. आम्ही मदत करू शकतो तर तुम्ही का नाही?. असा संदेश त्यांनी प्रत्यक्ष कृतीतुन दिला आहे. पौडवाल कुटुंबिय त्यांच्या सूर्योदय फौंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते, हे विशेष.
– देवेंद्र भुजबळ. 9869484800.
खूपच छान वाटलं बच्चे कंपनी च्या या उपक्रमाला सलाम