क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने त्यांना वाहिलेली ही शब्द सुमनांजली. सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन.
– संपादक
पेटवली स्त्रीशिक्षणाची जरी
सावित्रीमाईने घेत मशाल
महिल्या शिक्षित झाल्या तरी
संपले नाही गे त्यांचे हाल.
मन चित्त अन डोळे
भरून आज आले
साऊ तुझ्याच मूळे
शिक्षण घेऊ शकले
वंदन सावित्री माईला
लेखणी दिली हाती
शब्दातलिहितो आम्ही
तिचीच आज महती

— रचना : सौ. मीना घोडविंदे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
