Monday, February 2, 2026

क्षण…

क्षणांनी हसावे क्षणांनी रुसावे…
विसावून जावे मनाच्या किनारी..!

क्षणांनी क्षणांनाच हरवून न्यावे..
पुन्हा सापडावे मनाच्या किनारी..!

क्षणांचेच लेणे क्षणांनाच देणे..
बहरून यावे मनाच्या किनारी..!

कधी आंजरावे कधी गोंजरावे…
नव्याने जगावे मनाच्या किनारी..!

निसटत्या क्षणांचे टिपूस एवढेसे..
हळूच ते टिपावे मनाच्या किनारी..!

अलवार क्षण ते मनी साठलेले ..
नव्याने जपावे मनाच्या किनारी..!

— रचना : सौ. प्रिती प्रविण रोडे. अकोला
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Anil Deodhar on झेप : 9
Vinod Ganatra on झेप : 9