Tuesday, February 24, 2026
Homeसाहित्यक्षितीज....

क्षितीज….

पुन्हा तोच आवाज आला,
कोकीळ गातो, सांगू कुणाला ?
रम्य सकाळ, वसंत ही फुलला,
कोण असा जो, याला ना भुलला,

सुंदर दिसणे, सुंदर असणे,
येवढेच ना पुरेसे अाता,
विविधांगी कौशल्य शिकणे,
सहकाऱ्यांची सोबत,

सत्ता, साध्य कराया लक्ष्य परी ते,
मनाची एकाग्रता लागते,
साधनांच्या विविधतेसवे हो,
लढण्याची ती नशा लागते,

संघर्षाने जे मिळते त्याच्या,
आठवणी प्रेरणाच होती,
नवी लढाई करावयास्तव,
नवी क्षितिजे पुन्हा शोधती..!!!

हेमंत भिडे

– रचना : हेमंत भिडे
– संपादन : देवेंद्र भुजबळ.  ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments