Friday, November 22, 2024
Homeसाहित्यखरी संपत्ती

खरी संपत्ती

वाऱ्याच्या लहरीवर,
वृक्ष स्वच्छंद डोलती !
गोड चिमणी पाखरं,
मंजुळ गायन गाती !!

हिरवीगार पालवी,
मन मुराद हसती !
मृग पाऊस सरींनी,
वृक्ष ओलेचिंब न्हाती !!

हिरव्यागार पानाशी,
दवबिंदू जमा होती !
आनंदी रान पाखरे,
तृष्णा सारे भागवती !!

मधुर फुलोऱ्यावरी,
मधमाशी घोंगावती !
गाणे फुलांना गाऊन,
पराग रस चोखती !!

आंबट गोड फळांशी,
वानरे तोडून खाती !
राघू मैना आनंदाने,
टोचे फळांना मारती !!

पावसाच्या आनंदाने,
मोर लांडोर नाचती !
प्रेमे लांडोर मोराची,
आनंद अश्रु झेलती !!

कडाड कड करुनी,
वीज नभात गर्जती !
वर्षा ऋतूचे स्वागता,
जशी वाद्य वाजवती !!

मृग नक्षत्रांच्या सरी,
धोधो धारा बरसती !
धरणी मातेची तृष्णा,
पावसाने तृप्त होती !!

पैसा संपत्ती नावाने,
मानवाचे घात होती !
वृक्ष रोपण करुनी,
जपुया खरी संपत्ती !!

करा त्याग संपत्तीचा,
होईल सुखाची क्रांती !
प्रेम करा निसर्गाशी,
लाभेल मनास शांती !!

जी. पी. खैरनार.

–  रचना : जी. पी. खैरनार.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments