चार वाजले वेळ झाली चहा पिण्याची
अशी कशी दादा सवय तुम्हाला चहा पिण्याची |१|
चहा साठी दूधच नाही,
म्हैस विका गंपू गवळ्याची
अशी कशी दादा सवय तुम्हाला चहा पिण्याची |२|
साखर नाही,
हवेली मोडा आता तीन मजल्याची
अशी कशी दादा सवय तुम्हाला चहा पिण्याची |३|
चहा पावडर नाही,
आता अंगठीच मोडा एक तोळ्याची
अशी कशी दादा सवय तुम्हाला चहा पिण्याची |४|
नाश्ता करायला पोहेच नाही,
गिरणी टाका भात सडण्याची
अशी कशी दादा सवय तुम्हाला चहा पिण्याची |५|
कपबशा नाही,
बायको विका पहिल्या लग्नाची
अशी कशी दादा सवय तुम्हाला चहा पिण्याची |६|
2) प्रिय चहा
चहा पायी उठतो भडका
मनाला बसतो मोठा तडका
दिवस उगवल्या लागतो ग बाई
एक म्हणे कोरा चहाचीच घाई
दूजा म्हणे चंदनासारखा घोट सुनबाई
मामांजी म्हणतात मसाला घाल वाटूनबाई
मुलं म्हणतात काळा चहा लेमणचा देना
तब्येत सडपातळ करायला आवडतेना
नणंद चोचल्याची काॅफी वाचून ऐकेना
जाऊबाई म्हणते केशर उकाळा का करेना
आता तुम्हीच सांगा राया किती प्रकार करावे
सर्दी कफ झाला तुळशी मिरीचा काढा करना
पावसाळा आला आता म्हणतात आल लवंग कुटना
संगे भजीचा आण भारी डवना देखना
किती करावा जीवाचा आटापिटा थाटा
सर्दी झाली फार कर बाजरी लसणीचा घाटा
किती भी करा सरायची नाही ही व्यथा
काय सांगू तुम्हाला ह्या चहाची हो व्यथा
3) हवा हवासा चहा
सुंठ आल्याचा केला
खमंग असा चहा
पीत नाही कधी जरी
आवश्य पिऊनी पहा
नाना कंपन्या भुरळीत
वेड लावती ह्या जीवा
चहाचा मळा कुठे उगतो
नाम मात्र करती जाणीवा
हिरवी पिवळी मसालापत्ती
गवती रोईसा घातला त्यात
डोके दुखी सर्दी पडसे
मिटले चहा पिता क्षणात
कधी टपरीवर जावून पहा
बासुंदी घोटीत करतो चहा
पिताच डोके दुखी गायब
आळस ही गेला ह्यांचा अहा
पण भल्या मानसा उणीवा
कप जाहले फारच लहान
तल्लब भागेना ह्या मनाची
करू वाटे ना आता गुणगान
दाम जाहला ह्याचा मजबूत
काळे खडोळे जाई ना घशात
दूध झाले खोडकर पावडरीचे
आता पिवर दुधाच्या बुडू नशात

– रचना : सौ शोभा कोठावदे.