महिला दिनानिमित्त गझल….
जगू दे जरा थोडे तिच्यासारखे तिला
मिळाले नसे काही मनासारखे तिला..
भरव घास गोडाचा सणाला तरी तुझा
पुन्हा भासवू दे ना नव्यासारखे तिला..
तुझा राग वरवरचा तिने झेलला आता
हसू दे क्षणापुरते खुळ्यासारखे तिला..
उन्हे सोसुनी होती दिली सावली तुला
जपत जा तुही आता फुलासारखे तिला..
जुन्या आठवांचा कर उजाळा अधेमधे
तुझे शब्द वाटू दे जिवासारखे तिला..
— रचना : सौ. दिपाली वझे, बेंगळूरू
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800