गुटखा नको ग बाई, हिला गुटखा हवा ग बाई
मला गुटखा नको ग बाई, मला गुटखा नको ग बाई
गुटखा खायाची बात लई न्यारी
गुटखा चाखायची मजाच भारी
गुटखा खाल्यानं दुर्गंधी जाते
म्हणून गुटख्याशी नाते जोडते
मला गुटखा नको ग बाई, मला गुटखा नको ग बाई
अहो गुटखा खाऊन मिळतं काय ?
रस्ते रंगवायला मिळत ग बाय
कुणी चिकणा रस्त्यान जाय
त्याला रंगवायला मिळतं की नाय
हळूच डोळा मोडाया मिळत माय
मला गुटखा नको ग बाई, मला गुटखा नको ग बाई
आता मला सांग म्युन्सिपाल्टीला
काम हव की न्हाय
गुटख्या विना मजाच न्हाय
दाताच डाक्टर ह्याला काम ना मिळायच
तोडांच्या सुगंधान पोरी पळवायच
किती मजा हाय की न्हाय
मला गुटखा नको ग बाई, मला गुटखा नको ग बाई
अगं ह्या गुटख्या पायी मालकाच पोर गेलं ग बाई
तरी ह्याची अक्कल ठिकाणावर यायची न्हाई
कर्क रोगान पोर बी गेल पण…
पण काय!पैशाची पट्टी बांधली..
गुटखा नको ग बाई मला, गुटखा नको ग बाई
रसायनाच्या फॅक्टऱ्या बंद पडल्या
मालक देशा धडीला बुडाला
बुडाला तर बुडाला आपल्या बा च जात काय
हौश्या गौश्यांचा काबिला तडफडला
बरं झालं की न्हाय, बचत वाढली
रस्ते चकाचक दिसाया लागली
मला गुटखा नको ग बाई, मला गुटखा नको ग बाई
रेल्वे मधी हाप्ता दिला की पाय किती नोटा कमावल्या
सकाळचं निघते सांजलाच घरा येते
रेल्वे सुटणार असं पाहून आख्खी नोटच पळवते
हाय की न्हाय मजा
अगं मेले अशान जीव घेते ग
खायला घालून पण मारते
अन् नोटा भी पळवते !
गुटखा नको ग बाई, मला गुटखा नको ग बाई
अशी व्यसन नको ग बाई, मला गुटखा नको ग बाई,
मला गुटखा नको ग बाई….

– रचना : सौ शोभा कोठावदे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800