गुरु विना ज्ञान नाही
ज्ञाना विना समाजात मान नाही
गुरु पद लाभे हो त्याला
ज्याचा त्रिभुवणी जय जयकार झाला
गुरु हा अज्ञानाला ज्ञानी करी
गुरु हा सुपाचे कार्य करी
हलका हलका फेके बाहेरी
माझे नतमस्तक हो सद्गुरूच्या चरणावरी
गुरु विना ज्ञान………..!
गुरु आहे हो माझी माऊली
त्यांची नेहमी हो आमच्यावर सावली
गुरु हे निर्गुण, सगुण देवाचे रूप माई
त्यांचे नाव घेता सर्व विघ्न दूर होई
गुरु हा मानवाला माणुसकीचे धडे देई
मनोमनी मी त्यांचा नावाचा करितो जय जयकार माई
गुरु विना ज्ञान………..!!
गुरु माझा हो प्रेमाचा पसारा
तो आहे हो माझ्या जीवनाचा आसरा
त्यांनी गुरु मंत्र दिला राग, लोभ, मोह, माया विसरा
त्यांनी हो मला उचित मार्ग दाखविला
म्हणुनी माझा संसार हो सारा फुलला
जे जे माझ्या सदगुरु कडे असे
ते ते मला दूरदृष्टीने दिसे
गुरु विना ज्ञान…………!!!
गुरु हा अंधकरातून प्रकाशाकडे नेई
गुरु हा अधर्म धर्माचा ज्ञान मला देई
गुरु ने माझ्यातला सर्व अहंकार घालविला
त्यांनी हो मला माणसात देव दाखविला
सदगुरु हा अध्यात्माचा हो ठेवा
कृपावंत माझ्या सद्गुरुचा हो वाटे मला हेवा
मला वाटे त्यांच्या कडून ज्ञान किती घ्यावा
गुरु विना ज्ञान………….!!!!
गुरु हे माझे ज्ञानाचे व श्रध्देचे व्यासपीठ
त्यामूळे मी समाजात वागतो नीट
गुरु नेहमी लोक कल्याणासाठी झटे
गुरु नेहमी हो आम्हा दाटे
त्याकारणे आम्हा सद्बुद्धी भेटे
माझ्या बुद्धीवर चढलेला गंज गुरु काढे
त्याकारणे माझ्यात प्रेम बंधुभाव वाढे
गुरु माझा हो संस्कारी महान
नाव घेता गुरुचे होई मला समाधान
गुरु विना ज्ञान…………!!!!!
मूर्ती आणि किर्तीत फरक जाणावा
चित्रात आणि चरित्रात फरक जाणावा
ऋषी, मुनी, योगी, साधु, संत यांच्यातला अंतर ओळखावा
गुरु करावा समजून उमजून
गुरु करावा मन पारखून
गुरुकडे असावा सद्गुणांचा भांडार
गुरु आम्हा सांगे कर्माचा करावा भांडार
श्रीराम कृष्ण देव असूनी गुरु केला हो त्यांनी
तुम्ही ठरवा आता आपली पात्रता हो जनी जनार्दनी
या विनोद दासाचा साष्टांग नमस्कार सदगुरु चरणी
गुरु विना ज्ञान…………!!!!!!
– रचना : विनोद प्रल्हाद भांडारकर