Tuesday, September 16, 2025
Homeकलागुलजार आणि त्यांच्या भावमुद्रा !

गुलजार आणि त्यांच्या भावमुद्रा !

थोर गीतकार,दिग्दर्शक गुलजार यांचा काल ९१ वा वाढदिवस साजरा झाला. तर आज जागतिक छायाचित्र दिन आहे. या दोन्ही बाबींचे औचित्य साधून नांदेड येथील छायाचित्रकार विजय होकरणे यांनी गुलजार यांच्या टिपलेल्या विविध भावमुद्रा तसेच या थोर व्यक्तिमत्वाचे गुण विशेष पुढे देत आहे. गुलजार यांना वाढदिवसाच्या तर आपणा सर्वांना जागतिक छायाचित्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक

आपल्यासारखा मीही गुलजार यांचा चाहता आहे. मागील ४३ वर्षांच्या आयुष्यात छायाचित्रकार म्हणून शासकीय सेवा बजावित असताना तसेच कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडीत असताना, मी जसा जमेल तसा माझा छायाचित्रणाचा छंद जोपासत आलो आहे.

माझ्या छायाचित्रणाचा छंदामुळे कधी कधी नकळत माझ्याकडून अधिकचे छायाचित्रण होत आले आहे. अशीच संधी मला मिळाली ती, गुलजार हे नांदेड येथे नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेत “दृकश्राव्य कला और साहित्य” या विषयावर १० फेब्रुवारी २००७ रोजी व्याख्यान देण्यासाठी आले होते तेव्हा मिळाली. त्यावेळी गुलजार हे दोन दिवस नांदेड मध्ये होते. त्यामुळे मला त्यांचा भरपूर सहवास लाभला. त्यामुळे मला त्यांची विविध छायाचित्रे टिपता आली. त्यांचे हाव भाव बोलने, चालने, बसने, उठणे, लिहिणे, ईतरांचे बोलणे ऐकणे, सत्कार स्विकारणे या सोबतच मी त्यांच्या भावमुद्रा टिपणारी विविध छायाचित्रे काढली.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर गुलजार यांनी नरहर कुरुंदकर यांच्या प्रतिमेला जो पुष्पहार घातला तेव्हा इतरांसारखे
उपस्थित लोकांकडे पाठ करुन नाही तर नरहर कुरुंदकर गुरुजींच्या प्रतिमेमागे जाऊन त्यांनी पुष्पहार घातला. ही त्यांची कृती खचाखच भरलेल्या स्व शंकरराव चव्हाण सभागृतील उपस्थित सर्वांना खूप काही शिकवुन गेली. त्यांची प्रतिमेला घालण्याची ही पद्धत मला फार आवडली. तसे मी त्यांना बोलावून दाखविल्यावर त्यांच्या स्वभावप्रमाणे काही न बोलता, चश्म्याची दांडी तोंडात ठेवुन थोडेसे गालातल्या गालात हसून त्यांनी कुतुहलाने माझ्याकडे पाहिले. तीही त्यांची भाव मुद्रा मला टिपता आली.

जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून गुलजार यांच्या नांदेड भेटीतील अविस्मरणीय छायाचित्रे ही माझ्याकडची अलौकिक ठेव मी आपल्यापुढे सादर करीत आहे.

आपले प्रेम आणि प्रतिसाद हीच माझासाठी ऊर्जा आहे.

विजय होकर्णे

— लेखन, छायाचित्रण : विजय होकरणे. नांदेड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. Khup sunder photogrphy.🙏eka great vyaktichi bhavamudra tumhi khup chan tipli ahet.tyanchya sunder kavitanpramane👌👌👌👌

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments