Home बातम्या गोवा : अशी रंगली काव्यमैफल

गोवा : अशी रंगली काव्यमैफल

0

गोव्यात अशोक बोरकर काव्यमैफल नुकतीच उत्साहात पार पडली. या मैफलीत विविध रसांच्या कविता कवी- कवयित्रींनी सादर केल्या.

प्रारंभी अशोक बोरकर यांच्या स्मृतींना अभिवादन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. दीप प्रज्वलनाचा मान पहिल्या काव्यमैफलपासून सहभागी होणारे, अभय सुराणा, ज्येष्ठ कवयित्री दया मित्रगोत्री, काव्यमैफलमध्ये सर्व कार्यात पुढाकार घेणारे वल्लभ दुभाषी, एड. संतोष तिंबले, काव्यमैफलची उत्साहमूर्ती शर्मिला प्रभू आणि काव्यमैफलच्या सर्वेसर्वा कविता बोरकर यांना देण्यात आला.

यावेळी साहित्यविषयक प्रश्नमजूषा घेण्यात आली. वैशाली व्हरकट यांनी स्पर्धेचे सूत्रसंचालन केले तर काव्यमैफलीचे सूत्रसंचालन चित्रा क्षीरसागर यांनी केले.

बबिता नार्वेकर, वैशाली व्हरकट, अनुपमा नाईक, शीला प्रभुदेसाई, पुष्पा गायतोंडे, प्रकाश रामचंद्र क्षीरसागर, श्रीवल्लभ दुभाषी, संजीव भरणे, समीर हेदे, संतोष तिंबले, संतोष तिंबले, उमेश शिरगुप्पे, प्रमोद कारापूरकर, रजनी रायकर, दया मित्रगोत्री, स्नेहा केणी, अभय सुराणा, चित्रा क्षीरसागर, शिल्पा भिलेगावकर, विंदा काकोडकर, कविता बोरकर शर्मिला प्रभू यांनी कविता सादर करून रसिकांची दाद मिळवली.

— टीम एन एस टी.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version