Home बातम्या गोविंदनगर व्याख्यानमाला संपन्न

गोविंदनगर व्याख्यानमाला संपन्न

2

नाशिक येथे श्री. भालचंद्र रत्नपारखी यांच्या संकल्पनेतून २०१५ पासून सुरू असलेली, गोविंद नगर ज्येष्ठ नागरिक संघ आणि भावसार क्षत्रिय समाज नाशिक शहर यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसांची ६ वी वसंत व्याख्यानमाला भावसार समाजाच्या वातानुकूलित भवनात नुकतीच झाली.

या व्याख्यानमालेची सुरुवात दिंडोरीचे ॲड.श्री. भास्कर उध्दवराव मोरे उर्फ बापू मोरे यांनी “कुटुंबव्यवस्था: कालची, आजची व उद्याची” या विषयाद्वारे प्रथम पुष्प गुंफून केली. तर डॉ.सौ.अश्विनीताई बोरस्ते यांनी “माझ्या नजरेतून ज्येष्ठत्व” या विषयावर आपले विचार मांडले.

दुसरे पुष्प गुंफताना प्रा. डॉ.उल्हास रत्नपारखी यांनी “श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रातील काही पैलू” या विषयावर ज्ञानेश्वर महाराजांच्या सात पिढ्यांची सुंदर माहिती दिली.

वसंत व्याख्यानमालेचे तिसरे व शेवटचे पुष्प डॉ. श्री. संदीप भानोसे यांनी “गरुडझेप : एक संस्कार आणि संवर्धन” या विषयावर गुंफले. आपल्या व्याख्यानात डॉ भानोसे यांनी गरुड पक्षाचे ७२ विविध गुण सविस्तरपणे सांगितले.

तीन दिवसांच्या या कार्यक्रमाची सांगता सुरुची भोजनाने झाली. या कार्यक्रमासाठी निवृत्त माहिती संचालक श्री.सुधाकर तोरणे, श्री. विजय भावसार, श्री. ओमप्रकाश शर्मा, श्री.विजय डोंगरे यांचे सहकार्य लाभले.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

2 COMMENTS

  1. ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल अशी व्याख्यानमाला.स्तुत्य आणि ज्ञानविस्ताराचा सुंदर उपक्रम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version