Home बातम्या ग्रंथसंच भेट

ग्रंथसंच भेट

0

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यावर प्रकाशित झालेल्या
१) प्रकाशवाटा २)समिधा ३) नेगल ४) रान मित्र ५) आणि चांदणे उन्हात हसले, या 5 पुस्तकांचे 75 संच पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचा शुभ हस्ते 75 ग्रंथालयासाठी ग्रंथभेट सोहळा साहित्य मंदिर सभागृह, वाशी, नवी मुंबई येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन आनंदवन मित्र मंडळ, नवी मुंबई व प्रभात चँरिटेबल ट्रस्ट, नवी मुंबई यांच्या माध्यमातून करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरवात अमर दूडाम याच्या आनंदवन प्रार्थना गायनाने झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रशांत थोरात यांनी केले. तर आभार सुभाष कुळकर्णी यांनी केले.

या कार्यक्रमास ठाणे ग्रंथालयाचे प्रशांत पाटील, डॉ अजित मगदुम, डॉ अशोक पाटील, प्रा प्रताप महाडीक, थळे सर, मधुकर वारभुवन, इत्यादी मान्यवर उपस्थीय होते.

या कार्यक्रमाचे नियोजन जीवन निकम यांनी केले तर सूत्रसंचालन अमरजा चव्हाण यांनी केले.

आपण हा संपूर्ण कार्यक्रम पुढील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

https://www.youtube.com/live/C5y9xPQxyoc?si=AWuuwKh-YOftatN4

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version