हातावरच्या रेषांपेक्षा या भेगा
बरेच काही सांगत असतात
ऐहिक सुखांना नकळत
परमार्थाने भागत असतात
रेषा अमिट असतात
तशा भेगाही असतात खोल
चटके आणि काटे सोशित
लावत असतात भक्तीचा बोल
दमलेले पाय कोणीतरी चेपित असतो
वेदनेवर फुंकर कोणी घालित असतो
दूर पंढरीच्या देवळातला तो सावळा
सावली थंडगार जीवांना देत असतो
हाताच्या उशीवर रेषांची नक्शी
स्वप्न उरी माऊलीचे पडत असते
भेगांमधून अशा वेळी फक्त
चंद्रभागा भळभळा वाहत असते !

– रचना : मिलिंद बल्लाळ
खूप भाव स्पर्शी कविता
अजून चांगली तुम्ही लिहू शकता