Monday, July 14, 2025
Homeसाहित्यचंद्र मनीचा ढळला…

चंद्र मनीचा ढळला…

युगानुयुगाचे नाते आपुले
बालपणी चांदोबात दंग
लिंबोणीच्या झाडामागे तुझे लपणे
स्वप्नाची वाट जाई चंदाराणी संग ||१||

तुपरोटीत पडता माशी
तू जात असे उपाशी
बहिणी ओवाळती तुज
गणपती पडताच हसलासी ||२||

काळा डाग पडला मुखावरी
चंद्रमुखी, कधी चंदाराणी दिसे
सुख दुःखाचे नाते जडले तुझ्याशी
चांद्रायान तिसरे जात, मृगजळ भासे ||३||

अज्ञात वाटा ज्ञानाच्या कक्षेत
जगाला दिलेस ज्ञान भांडार
तुझ्या वरील खाचखळगे
मनाला पाडती खिंडार ||४||

भारताचा तिरंगा फडके अभिमानाने
शिवशक्ती विराजे चंद्रावरती
तुझ्या अंतरीची कोडी सोडवती शास्रज्ञ
जगी नांदती ज्ञानी भारती ||५||

— रचना : अंजली मस्करेन्हस. डहाणू
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments