सांगू नको ग तू आई
त्याचा उगाच महिमा
कधीच का भेटत नाही
मामा असून चांदोमामा
आवडते आम्हा सर्वांना
त्याचे सुंदर असे नाव
निळे निळे त्याचे डोळे
आभाळ त्याचे गाव
दुरूनच बघतो आम्ही
गाव आपल्या मामाचे
जायला मिळेल तेंव्हा
दिवस येतील भाग्याचे
रात्रीचा राखणदार
आहे बराच सुस्त
पौर्णिेमेला गोलमटोल
दिसतो अधिक मस्त
विहरतो मस्त चांदण्यात
मामी भोळी बिचारी
रागावली ती की मग
ढगाआड लपते स्वारी

– रचना : विलास कुलकर्णी