Homeकलाचित्र सफर : 61

चित्र सफर : 61

“वक़्त से परे”

यूट्यूबवर गाणी ऐकतांना प्रतिभा सिंग बघेल यांनी नोव्हेंबर, २०२४ मध्ये रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये केलेल्या कार्यक्रमाचा पहिला भाग दिसला. सोबत जावेद अख्तर सूत्रधार होते. कार्यक्रम आवडला.

प्रतिभा सिंग बघेल

लता मंगेशकर तिथे १९७४ मध्ये गायल्या होत्या. तिथे गाणाऱ्या त्या पहिल्या भारतीय गायिका होत्या. त्यावेळी सगळ्या वृत्तपत्रांतून त्या कार्यक्रमाचे भरपूर कौतुक आले होते. विविध भारतीवर, आकाशवाणीच्या इतर केंद्रांवर आणि रेडिओ सिलोनवर त्यांनी तिथे गायलेली काही गाणी, वेगवेगळ्या कार्यक्रमातून वाजवली गेली होती. त्यामुळे मला त्या हॉलचे नाव लक्षात आहे.

प्रतिभा बघेल यांचा तो कार्यक्रम मोठ्या स्क्रीनवर, डॉल्बी किंवा कमीत कमी स्टिरिओ लावून ऐकाल तर रॉयल अल्बर्ट हॉलची किंचितशी झलक नक्की अनुभवता येईल.

रॉयल अल्बर्ट हॉल

इथपर्यंत वाचले असेल, तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, या लेखाचा मथळा – “वक़्त से परे” असा काय दिलाय, या बाबाने?
संदर्भीत कार्यक्रमाची सुरुवात, प्रतिभा बघेल या अंतऱ्याने करतात –
“वक़्त के सितम, कम हसीं नहीं
आज हैं यहाँ, कल कहीं नहीं
वक़्त से परे अगर, मिल गये कहीं
मेरी आवाज़ ही …”

“नाम गुम जायेगा चेहरा ये बदल जायेगा…”
किनारा सिनेमातील हे गाणे गुलज़ार यांनी लिहिले आहे.
ज्या, ज्या वेळी मी हे गाणे ऐकतो, तेंव्हा, तेंव्हा मला दुसरे एक गाणे आठवते-
“वक़्त ने किया क्या हंसीं सितम
तुम रहे न तुम हम रहे न हम…”
गीता दत्त यांनी गायलेल्या ‘कागज़ के फूल’ या सिनेमातले क़ैफी आझमी यांच्या गाण्याचा हा मुखडा आहे.

क़ैफी आझमी यांच्या या गाण्यानंतर आणि आधीही “वक़्त” या विषयावर अनेक गाणी आली. पण गुलज़ार यांच्या इतका गहन अर्थ देणारी क्वचितच !

कदाचित गुलज़ार यांनीही या ओळी काहीशा rearrange करून वरच्या गाण्यात उचलल्या आहेत. पण त्याच अंतऱ्यातील-
‘वक़्त से परे अगर, मिल गये कहीं…’
तुम्हाला नाही वाटत, गुलज़ार एकदम वेगळेच काहीतरी लिहून गेले आहेत.
“वेळ अस्तित्वात नसेल अशा ठिकाणी भेटलो तर…”
“वक़्त से परे” ही आपल्याला वक़्तच घेऊन जातो, नाही ?
अनेक कार्यक्रमातून, struggler किंवा क्वचित नामवंत गायकांच्या गायकीतून, मूळ गायक “वक़्त से परे”, आपल्याला भेटतात.

इतर अनेक गीतकार सोपे लिहिण्यावर भर देतात. तर गुलज़ार काही अवघड लिहून जातात. इथेच अस्तित्वात असलेले, परंतू सामान्यांच्या लक्षात न येणारे, वेगळ्या भाषेत आणि थोड्या शब्दात! मुख्य म्हणजे ऐकणाऱ्याला कल्पनाशक्ती वापरायला उद्युक्त करणारे!

त्यांची इतरही गाणी आठवून बघा.
उदा :
“एक बार वक्त से लम्हा गिरा कहीं
वहाँ दास्ताँ मिली लम्हा कहीं नहीं”

आणखीनही अनेक आहेत.
आनंद मधले “ना जिया लागे ना…”
इज़ाज़त मधले “मेरा कुछ सामान…”
घर मधली गाणी.
अनेक, अनेक !

प्रतिभा बघेल यांचा तो कार्यक्रम बघतांना डोक्यात जो गोंधळ उडाला तो शब्दात मांडण्याचा आणि माझ्या त्या आनंदात तुम्हाला सामील करुन घेण्याचा हा छोटासा प्रयत्न होता.

त्या निमित्ताने इतर दिग्गजांपेक्षाही गुलजार यांना मी प्रकर्षाने ‘वक़्त से परे’ कसा भेटून आलो, ते सांगण्याचा !

— लेखन : चंद्रशेखर पासेबंद. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments