मुंबईच्या चेंबूर भागातील गोरगरीब, झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रवीण खंडू गुंजाळ यांनी २००७ मध्ये स्टॅंडर्ड ट्युटोरियल क्लासेसची स्थापनेला नुकतीच १८ वर्षे पूर्ण झाली. या क्लासेसचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.
या क्लासमधून बारावीच्या २०२४ बोर्ड परीक्षेत पहिली आलेली मानसी सातपुते, दुसरा आलेला रोहन सावंत, तिसरी आलेली वैदेही जाधव यांचा पाहुणे कवी अनंत धनसरे यांच्याहस्ते स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
क्लासेसच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक अभिजीत नायक व द्वितीय क्रमांक प्रतीक थोरात, लुडो स्पर्धेत प्रथम क्रमांक अवेस शेख, द्वितीय क्रमांक अफरीन शेख आणि कॅरम स्पर्धेत विकास राऊत आणि मेंदी स्पर्धेत प्रथम क्रमांक पिंकी मौर्या द्वितीय क्रमांक रवीना नागोटकर, पब्जी प्रथम क्रमांक अमेय भुजबळ, फ्री फायर प्रथम क्रमांक आर्यन पवार या विद्यार्थ्यांचा यावेळी गुंजाळ सरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

प्रारंभी गुंजाळ सरांनी विद्यार्थ्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना खत्री मॅडम यांनी केले.

रिलस्टार विनायक नाटेकर, अस्तित्व सामाजिक बहुउद्देशीय सेवा संस्थचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप गुंजाळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, चेंबुर वरिष्ठ महाविद्यालयाचे इन्चार्ज विनोद गाडे सर, शारदा खेडकर, प्रिया सरवदे, श्रीकांत कुलकर्णी, मदनलाल पाल, तसेच शब्बी सय्यद, नगमा शेख, प्रज्ञा कांबळे, सय्यद गौस, सोनम नार, आदी शिक्षक आणि विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
अतिशय कौतुकास्पद⚘️