बाबा माझा आदर्शच
मन त्याचे मोठे फार ।
जसा काटेरी फणस
आत त्याच्या गरे गार ।।१।।
जन्मदाता माझा भला
संघर्षाची त्याची वाट ।
खूप संकटे झेलली
नागमोडी होता घाट।।२।।
नाही केला त्याने मोह
रात्र दिवस राबला ।
सारे आयुष्य खर्चले
नाही कधीच थांबला ।।३।।
पोरं माझी शिकावित
होती इच्छा त्याची फार ।
साधे कपडे घालूनी
सांभाळले घरदार ।।४।।
ज्येष्ठ सर्व गावातला
मान त्याचा होता बरा ।
कधी नाही घाबरला
न्याय दिला त्याने खरा ।।५।।
स्वाभिमानी जगण्याचा
वसा त्याने दिला मला ।
जन्म अपुरा पडेल
ऋण त्याचे मोजायला ।।६ ।।

– रचना : अरुण त्रिंबक पुराणिक
फार छान कविता