Home बातम्या “जागर तंबाखू मुक्तीचा” प्रकाशित

“जागर तंबाखू मुक्तीचा” प्रकाशित

0

तंबाखूमूक्त समाजासाठी एक हात मदतीचा – जागर तंबाखूमूक्त समाजाचा हा संकल्प पूर्ण करण्यासाठी धडपडणारे, नरोत्तम सक्सेरिया फाऊंडेशनचा “तंबाखू मूक्तीदूत” हा राष्ट्रीय पुरस्कार विजेते मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी लिहिलेल्या “जागर तंबाखूमूक्तीचा” या पुस्तकाचे प्रकाशन रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील वशेणी येथे नुकतेच झाले.

या वेळी तंबाखूमूक्तीवर कवी भरत पाटील यांनी आगरी बोलीत कविता सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. वशेणी गावातील मूर्तीकार देवानंद पाटील (पेंटर) यांनी यावेळेस स्वतःला तंबाखू पासून कसा त्रास झाला आणि यमाच्या दारातून कसा परत आलो याचा वृत्तांत सांगून गेली तीन महिन्या पासून मी तंबाखू सोडला आहे. या पुढे खाणार नाही, आणि कुटूंबाला तंबाखू पासून दूर ठेवीन असा संकल्प केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात रायगड भूषण प्रा.एल बी पाटील सर यांनी जागर तंबाखूमूक्तीचा हा विषय केवळ एकट्या मच्छिंद्र म्हात्रे चा नसून हा एक चळवळीचा विषय आहे. या चळवळीत आपण सा-यानीच जर समर्थन दिले तर एक दिवस मच्छिंद्र म्हात्रे यांच्या मनातील तंबाखूमूक्त समाजाचा संकल्प पूर्ण होईल. या पुस्तकाची जडण घडण, वैचारिकता, सामाजिक मूल्य पाहता महाराष्ट्राला सुध्दा या पुस्तकाची दखल घ्यावी लागेल. असे मत व्यक्त केले.

या प्रसंगी काॅ.भूषण पाटील, संदिप पाटील, सुधाकर पाटील, साहित्यिक ए डी पाटिल, विचार प्रवर्तक सुधीर पवार, अ‍ॅड.प्रसाद पाटील, कोकणरत्न रविशेठ पाटील आदि मान्यवरांनी आपापली मनोगते सादर केली.

सह्याद्रीरत्न तथा शिव व्याख्याते धीरेद्र ठाकूर यांच्या सुरेख सूत्रसंचालनाने कार्यक्रमाचे उंची अधिकच वाढली .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वि .रा. पाटील यांनी केले. तर इंडिया झिंदाबाद फ्रेण्डस गृपच्या महिला कार्यवाहक श्वेता राकेश पाटील यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे जिल्हाध्यक्ष सुभाष भोपी सर, स्नेहबंध समूह,वशेणी इतिहास संपादकीय मंडळ, एस एस एस परिवार, इंडिया झिंदाबाद फ्रेण्ड्स गृप रायगड व अन्य स्नेही बंधू भगिनींकडून लेखकाचा सत्कार करण्यात आला.

यावेळी विविध मान्यवर, नागरिक, स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांना पुस्तकाची प्रत भेट देण्यात आली.

विठ्ठल ममताबादे.

– लेखन : विठ्ल ममताबादे. उरण
–  संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version